uddhav thackeray
uddhav thackeray 
महाराष्ट्र

जाहिरातबाजीचं सरकार खाली खेचावं लागेल: उद्धव ठाकरे

वृत्तसंस्था

मुंबई - 2019 मधील लोकसभा निवडणूक व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर (भाजप) युती न करण्याची घोषणा शिवसेनेकडून आज (मंगळवार) करण्यात आली. सेनेचे खासदार संजय राउत यांनी मुंबईमध्ये शिवसेनेच्या अधिवेशनात यासंदर्भातील ठराव मांडला आणि तो एकमताने संमत करण्यात आला. 

याबरोबरच लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 पैकी 25 जागा; आणि विधानसभेच्या 288 पैकी 150 जागा जिंकण्याचा निर्धारही शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला. उद्धव यांचे तरुण पुत्र व युवा सेनेचे नेते आदित्य यांनाही राजकीय बढती देत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र टीका केली.

उद्धव म्हणाले -

  • निवडणुका आल्या की पाकिस्तानचा विषय निघतो; गुजरात निवडणुकीवेळी पाकिस्तानचा विषय काढण्याचा काय संबंध?
  • नुसती ५६ इंचाची छाती असून उपयोग नाही. त्या ५६ इंचाच्या छातीत शौर्यच नसेल तर काय उपयोग? जम्मू-काश्मीरमध्ये भाजप ज्या पक्षाच्या मांडीला मांडी लावून सत्तेवर बसला आहे त्या पक्षाचे (पीडीपीचे) आमदार दहशतवाद्यांचा उल्लेख ‘आमचे भाऊ’ म्हणून करतात. मोदींनी अहमदाबादऐवजी जम्मू- काश्मीरमध्ये रोड शो केला असता आणि लाल चौकात तिरंगा फडकावला असता तर मी स्वतः मोदींचे कौतुक केले असते.
  • हिंदु मतांमध्ये फाटाफुट नको म्हणुन आम्ही आजपर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर निवडणुका लढलो नाही पण यापुढे शिवसेना राज्याबाहेर निवडणुका लढणार.
  • नितीन गडकरींकडुन सैनिकांची अवहेलना
  • जाहिरातबाजीवर चालणारं सरकार आपल्याला खाली खेचावं लागेल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT