Sanjay Raut
Sanjay Raut esakal
महाराष्ट्र

Shivsena : "खासदारकीसाठी संजय राऊत स्वतः एकनाथ शिंदेंच्या पाया पडत होते" - संजय शिरसाट

वैष्णवी कारंजकर

संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. आमच्या जुगाडामुळेच संजय राऊत खासदार झाले, असं विधान शिरसाट यांनी केलं आहे. तसंच राऊत एकनाथ शिंदेंच्या पाया पडत होते, त्यामुळे ते निवडून आले, असं शिरसाट म्हणाले आहेत.

संजय शिरसाट माध्यमांशी बोलताना म्हणाले, "संजय राऊत सध्या खानदेशात म्हणजे जळगावमध्ये आहेत. तिथे उन्हाचा पारा जास्त असल्याने आधीच वेडा असलेला माणूस आणखी वेडा झालेला आहे. त्यामुळे अशी बेछुट वक्तव्य ते करत असतात. मूर्खांचा जर कोण बादशाह असेल तर तो संजय राऊत आहे."

"आम्हाला जे जमलं ते आम्ही करून दाखवलेला आहे आणि आमच्या जुगाडा मुळेच ते संजय राऊत हे खासदार झाले आहेत. संजय राऊतच स्वतः एकनाथ शिंदेंच्या पाया पडत होते माझी शेवटची टर्म आहे, त्यामुळे मला यंदा सांभाळून घ्या. नाहीतर संजय राऊत यांना कधीच पाडलं असतं. आमची मानसिकता होती ती शिंदे साहेब बोलले म्हणून आम्ही त्याला मत दिली", असंही संजय शिरसाट म्हणाले आहेत.

दुसरा संजय निवडून यायला पाहिजे होता हे आमचं प्रामाणिक मत होतं. परंतु मातोश्रीला प्रायोरिटी ही या संजयला द्यायची होती. मतांची गोळा बेरीज पाहिली तर या संजय राऊतला जास्त मतांचा कोटा दिला. त्यामुळे हा संजय राऊत फक्त अर्ध्या मताने निवडून आलेला आहे. अर्ध्या डोक्याचा माणूस अर्ध्या मताने निवडून आलेला आहे, असं म्हणत शिरसाट यांनी संजय राऊतांवर खरमरीत टीका केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

Aditya Thackeray: लोकसभेनंतर शरद पवार भाजपसोबत जातील का? विश्वासार्हतेबद्दल आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT