महाराष्ट्र

'किडनी घ्या, बियाणे द्या' म्हणणाऱ्या शेतकऱ्याला शिवसेनेकडून मदत (व्हिडिओ)

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : 'किडनी घ्या, बियाणे द्या' म्हणणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यात शिवसेनेने मदत निधी जमा केला आहे. शिवसेनेकडून संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमाफीसाठी 82 हजार 367 रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. ही सर्व रक्कम कर्जमाफीच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.

नामदेव पतंगे असे संबंधित शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने 'किडनी घ्या, बियाणे द्या' असे म्हणत आपली व्यथा 'सकाळ', 'साम' टीव्हीच्या माध्यमातून मांडली. त्यानंतर या वृत्ताची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नामदेव पतंगे या शेतकऱ्याला मदतीचे आश्वासन दिले होते. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पतंगे यांची भेट घेऊन आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आता पंतगे यांना शिवसेनेकडून 82 हजार 367 रुपयांची मदत केली. ही सर्व रक्कम पतंगे यांच्या कर्जमाफीच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.

दरम्यान, याबाबतचे वृत्त 'सकाळ', 'साम'ने दाखवल्यामुळे मला ही मदत मिळू शकली. यासाठी मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत पतंगे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT