महाराष्ट्र

अरबी समुद्रातील स्मारकाला अनेकांचा विरोध 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - शिवस्मारकाच्या पायभरणीच्या कार्यक्रमात झालेल्या बोट अपघातानंतर आता स्मारकाच्या प्रस्तावित जागेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. हे स्मारक अरबी समुद्रात न होता अन्यत्र ठिकाणी व्हावे, अशी मागणी होऊ लागली आहे. या अपघातात एक बळी गेल्यानंतर भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शिवस्मारक राजभवन येथे उभारावे, यावे अशी मागणी मराठा सेवा संघाकडून आधीच करण्यात आली. 

व्हाइस ऍडमिरल आय. सी. राव (निवृत्त) यांनी स्मारक भाऊच्या धक्‍क्‍यापासून एक किमी अंतरावर क्रॉस आयलंडवर उभारावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मराठा क्रांती मोर्चाने मात्र हे स्मारक आहे त्याच जागी करावे, अशी मागणी केली आहे. झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र स्मारक नियोजित जागीच करावे, असे मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. 

स्मारकाबाबतची मते 
शिवस्मारक प्रकल्पाच्या वैधतेबाबत विविध संस्थांनी दिलेला अहवाल सरकारच्या दबावाखाली देण्यात आला आहे : व्हाइस ऍडमिरल आय. सी. राव (निवृत्त) 
रायगड किल्ल्याच्या परिसरात एखाद्या डोंगरावर स्मारक करा - संभाजी ब्रिगेड 
सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्मारक उभारा - नितेश राणे 
मलबार हिल येथील राजभवनाच्या जागेवर स्मारक उभारावे : मागणी मराठा सेवा संघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT