महाराष्ट्र

Loksabha 2019 : लहान पक्ष अस्तित्वहीन

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीच्या राजकारणाचा मोठा फटका शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), रिपब्लिकन पक्षाचे अन्य गट, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाला बसला आहे. 

लोकसभा निवडणुकीतील महाआघाडीत सहभागी झाल्यामुळे शेकाप, तर भाजपने जागा  देण्यास नकार दिल्यामुळे रिपब्लिकन (आठवले गट), रासप  यांच्या नशिबी निवडणूक वनवास आला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत छोटे पक्ष अस्तित्वहीन ठरले आहेत.

राज्यात जुन्या राजकीय पक्षांपैकी एक म्हणून शेकाप ओळखला जातो. शेकापने पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून अर्थात १९५२ पासून निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, आता हा पक्ष रायगड आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍यापुरता मर्यादित आहे. यंदा शेकाप प्रथमच निवडणूक रिंगणाबाहेर राहणार आहे.

रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हे १९९६ पासून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. या वेळी भाजपने लोकसभेचा एकही मतदारसंघ देण्यास नकार दिल्याने आठवलेंना माघार घ्यावी लागली. 

धनगर समाजाचे नेते आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे २००९ च्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपसोबत आहेत. गेली निवडणूक बारामतीतून लढताना जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तोंडाला फेस आणला होता. या वेळी जानकर यांनी भाजपकडे लोकसभेच्या सहा  जागांची मागणी केली होती. परंतु, भाजपने आठवलेंप्रमाणे जानकर यांचीही आश्वासनावर बोळवण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT