solapur airport sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरची विमानसेवा सुरू! ९ जूनला उडणार गोव्याच्या दिशेने विमान, १ ऑगस्टपासून सोलापूर-मुंबई विमानसेवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी सोलापुरात

सोलापूर ते गोवा विमानसेवेचा प्रारंभ सोमवारी (ता. ९) सकाळी होणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विमानसेवेचे सोलापूरकरांनी पाहिलेले अनेक वर्षांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. या विमानसेवेतून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्‍वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : सोलापूर ते गोवा विमानसेवेचा प्रारंभ सोमवारी (ता. ९) सकाळी होणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विमानसेवेचे सोलापूरकरांनी पाहिलेले अनेक वर्षांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. या विमानसेवेतून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्‍वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची आज (शुक्रवारी) दुपारी चारच्या दरम्यान नियोजन भवनात पत्रकार परिषद झाली. यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांच्या भ्रमणध्वनीवरून पालकमंत्री गोरे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. पालकमंत्री गोरे म्हणाले, १ ऑगस्टपासून सोलापूर ते मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याची तयारी झाली आहे. सोलापूर ते गोवा विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस या संदर्भातील घोषणा करतील, असा विश्‍वासही पालकमंत्री गोरे यांनी व्यक्त केला आहे. केंद्र शासनाच्या उडाण योजनेचा लाभ सोलापूरला द्यावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.

सोलापूरवरून आता गोवा अन्‌ मुंबईसाठी विमान

सोमवारी (ता. ९) मुख्यमंत्री फडणवीस सोलापूरच्या दौऱ्यावर येणार असल्याचे आता जवळपास निश्‍चित झाले आहे. या दौऱ्यात अन्य कोणते कार्यक्रम होणार का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबईसोबतच सोलापुरातून तिरुपती बालाजी, हैदराबाद व बंगळूर येथेही विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोमवारच्या सोलापूर दौऱ्यात आणखी काही घोषणा होतात का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Politics : भाजपच्या भरवशावर राहू नका, स्वबळावर लढण्याची तयारी करा; शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांना निर्देश

Minister Pratap Sarnaik: दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा: मंत्री प्रताप सरनाईकांची उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

चक्क 7000 mAh बॅटरीसह लाँच झाला Oppo K13 Turbo 5G, दमदार फीचर्स, ब्रँड कॅमेरा अन् फोनची किंमत फक्त...

India squad for Asia Cup 2025: ठरलं! जसप्रीत बुमराह आशिया चषक खेळणार, पण...; भारताचा संघ जाहीर होण्याची तारीखही ठरली

Maharashtra Police Bharti: पोरांनो तयारीला लागा रे! महाराष्ट्रात 14 हजार पोलीस पदांच्या मेगा भरतीला मंजुरी

SCROLL FOR NEXT