
Oppo K13 Turbo 5G सिरिजचे भारतात अधिकृत लॉन्च 11ऑगस्ट रोजी झाले.
या मालिकेत मोठी 7000mAh बॅटरीसह यामध्ये टॉप फीचर्स आहेत.
टर्बो आणि टर्बो प्रो मॉडेल्स 15 आणि 18 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील.
Oppo K13 Turbo 5G Price : भारतात स्मार्टफोन मार्केटमध्ये ओप्पोने आपली बहुप्रतिक्षित K13 टर्बो 5G सिरीज 11 ऑगस्ट रोजी लॉन्च केली. मध्यम बजेट श्रेणीतील ही सिरीज Oppo K13 Turbo 5G आणिK13 Turbo Pro अशा दोन मॉडेल्समध्ये सादर करण्यात आली आहे. प्रचंड 7000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 12GB रॅमसह ही सिरीज टेक प्रेमींसाठी आकर्षक पर्याय ठरत आहे. गेल्या महिन्यात ही सिरीज चीनी मार्केटमध्ये लॉन्च झाली होती आणि आता ती भारतात दाखल झाली आहे.