महाराष्ट्र

शिक्षक बदलीच्या पोर्टलमध्ये "एरर' 

संतोष सिरसट

सोलापूर - राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑनलाइन बदल्यांसाठी सरकारने पोर्टल तयार केले आहे. मात्र, त्या पोर्टलमध्ये "एरर' येत असल्याने शिक्षकांची धाकधूक वाढली आहे. एका शिक्षकाचा अर्ज भरण्यासाठी तब्बल नऊ तासांचा अवधी लागत असल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत. 

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी शासनाने 27 फेब्रुवारीला आदेश काढला आहे. त्या बदली आदेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात शिक्षक संघाने याचिका दाखल केली होती. त्याला 30 जूनपर्यंत "जैसे थे' स्थितीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाने या बदल्या संदर्भात अनेक शुद्धिपत्रके काढली आहेत. त्यानंतर शेवटी सरकारने त्या बदली आदेशातील संवर्ग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी पोर्टल तयार केले. त्या पोर्टलवर माहिती भरण्यासाठी या संवर्गातील शिक्षकांना उद्या (शनिवारी) सकाळी दहा वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. 

काही शिक्षक संघटनांनी कोणत्याही शिक्षकांनी माहिती भरू नये, असे आवाहन केले आहे. मात्र, यामध्ये पात्र असलेले शिक्षक आपली संपूर्ण माहिती पोर्टलवर भरण्यासाठी मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे त्या पोर्टलमध्ये "एरर' येऊ लागली आहे. त्याचबरोबर एका शिक्षकाची माहिती भरण्यासाठी तब्बल आठ-नऊ तासांचा कालावधी लागत आहे. बदल्यांसाठी ऑनलाइन माहिती भरण्यासाठी शिक्षकांना रात्र जागून काढावी लागत आहे. ही माहिती भरण्यासाठी सरकार मुदत वाढवून देणार का? याकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे. 

शिक्षकांमधील अस्वस्थतेचा विद्यार्थ्यांवर परिणाम 
नव्या शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली आहे. मात्र, अद्यापही जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यांचा विषय मार्गी लागला नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे. याबाबत सरकारने ठोस भूमिका घेऊन हा विषय मार्गी लावण्याची अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT