special qurantine prison to be build by state government 
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील या जिल्ह्यात होणार बंदिवानांसाठी विशेष क्वारंटाइन कारागृह, पहिलाच प्रयोग

रूपेश खैरी

वर्धा : कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कारागृहातील अनेक बंदिवानांना सोडण्यात आले. तरीदेखील त्यांची संख्या वाढतच आहे. नव्याने आलेल्या बंदिवानांना थेट कारागृहात टाकणे शक्य नाही. नियमानुसार त्यांची कोरोना चाचणी करून त्याला १४ दिवस विलगीकरणात ठेवणे अनिवार्य आहे. याकरिता वर्धा प्रशासनाने येणाऱ्या बंदीवानांसाठी क्वारंटाइन कारागृहाची निर्मिती केली आहे.

या क्वारंटाइन कारागृहात एका वेळी ५० बंदी राहणार आहेत. यात २५ महिला आणि २५ पुरुषांचा समावेश राहणार आहे. याकरिता जिल्हा क्रीडा संकुलातील दोन मोठ्या खोल्या वापरण्यात येणार आहे. तसेच याकरिता जिल्हा परिषदेच्या बंद असलेल्या शाळांचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. परंतु, यातून त्यांच्या पलायनाचा धोका आहे. यामुळे या क्रीडा संकुलाच्या खोल्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. या खोल्यांच्या दुरुस्तीच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात कारागृहातील गर्दी टाळण्याकरिता शासनाच्या वतीने क्षमतेपेक्षा अधिक बंदी असलेल्या जिल्हा कारागृहातून अडीचशेच्या आसपास बंदींना सोडले आहे. सध्या जिल्हा कारागृहात क्षमतेच्या तुलनेत बंदी आहेत. नव्याने येणाऱ्या बंदीवानांची कोरोना चाचणी करूनच त्याला कारागृहात परवानगी देण्याच्या सूचना आहेत. या सूचनेनुसार काम सुरू आहे. परंतु, नव्याने येणाऱ्या बंद्याला कारागृहात विलगीकरणात ठेवणे शक्य नसल्याचे पुढे आले. यातूनच या क्वारंटाइन कारागृहाची संकल्पना उदयास आली.

जिल्हा कारागृहाच्या वतीने तसा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी करून तो  प्रस्ताव मंजूर केला आहे. लवकरच या क्वारंटाइन कारागृहाच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मंजुरी देण्यात येणार असलेल्या खोल्यांची दुरुस्ती बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. बंदी बांधवांसाठी या संसर्गाच्या काळात असा क्वारंटाइन कारागृह निर्माण करणारा वर्धा जिल्हा राज्यातील पहिलाच असल्याचे बोलले जात आहे.
 
इतिहासात पहिल्यांदाच क्षमतेपेक्षा कमी बंदी

जिल्हा कारागृहात २५२ बंदीची क्षमता आहे. परंतु, या कारागृहात नेहमीच क्षमतेपेक्षा अधिक बंदी असल्याचे पुढे आले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात कारागृहात असलेल्या काही बंदींना सोडण्याचे आदेश आले त्या काळात येथे ४८७ बंदी होते. आज स्थितीत या कारागृहात २३० बंदी आहेत. इतिहासात पहिल्यांदाच या कारागृहात क्षमतेपेक्षा कमी बंदी असल्याचा प्रकार घडल्याने कारागृह व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे.

सध्या कारागृहात येत असलेल्या बंदीची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. असे तरी त्याला विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे. जर या बंदीला कोरोना संसर्गाची लागण झाली असेल तर त्यांच्याकडून कारागृृहात या संसर्गाची लागण होण्याची शक्यता आहे. यामुळे या बंदीला विलगीकरणात ठेवण्याकरिता वध्र्यात क्वारंटाइन कारागृहाची संकल्पना अस्तित्वात आणली. याकरिता जिल्हा क्रीडा संकुल किंवा जिल्हा परिषदेच्या बंद असलेल्या शाळांचा वापर करण्याचा प्रयत्न आहे.
- विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी वर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT