महाराष्ट्र

एसटी बॅंक कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - वेतनवाढ करार आणि निवृत्तीचे वय वाढवणे, या मागण्यांसाठी एसटी को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज केले. या मागण्यांकडे बॅंक प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास "काम बंद' आंदोलन करण्याचा इशारा युनियनने दिला आहे. 

एसटी को-ऑप. बॅंक कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराची कोंडी अद्याप सुटलेली नाही. कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 58 वरून 60 वर्षे करण्याची मागणीही प्रलंबित आहे. या मागण्यांकडे बॅंक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी अभ्यास करत असल्याचे बॅंक प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

एसटी को-ऑपरेटिव्ह बॅंक प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अनेक वेळा निवेदने दिली; परंतु प्रशासन गंभीर नसल्याचेच दिसून येते. त्यामुळे भविष्यात "काम बंद' आंदोलन करणार आहोत. 
- सुनील साळवी, कार्याध्यक्ष, एसटी को-ऑपरोटिव्ह बॅंक एम्प्लॉईज युनियन. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT