ST-Mahamandal
ST-Mahamandal 
महाराष्ट्र

एसटीत ४ हजार ४१६ जागा

सकाळवृत्तसेवा

भवानीनगर - एसटी महामंडळात पुणे विभागासह राज्यातील १२ विभागांमध्ये मिळून ४ हजार ४१६ चालक, वाहकांची भरती होणार आहे. त्याकरिता येत्या ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. विशेष म्हणजे एसटी महामंडळाने अर्ज भरल्यानंतर काही त्रुटी राहिल्यास अथवा दुरुस्ती करावयाची असल्यास त्यासाठी १२ ते १५ फेब्रुवारी २०१९ चा कालावधी दिला आहे. 

या प्रक्रियेत पुणे विभाग (१६४७ जागा), सोलापूर विभाग (५९१). नाशिक विभाग (११२), जळगाव (२२३), धुळे विभाग (२६८), यवतमाळ विभाग (१७१), बुलडाणा (४७२), अकोला विभाग (३३), अमरावती (२३०), परभणी (२०३), जालना विभाग (२२६), औरंगाबाद (२४०) या विभागांमध्ये भरती होणार आहे. या जागांव्यतिरिक्त उमेदवार प्रतीक्षा यादीत राहिल्यास त्यांना औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबविल्या जाणार असलेल्या शहर वाहतूक योजनेसाठी १५ हजार रुपये एवढ्या ठोक रकमेवर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती स्वीकारण्याचा पर्याय राहणार आहे. 

या भरतीकरिता उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा, त्याला मराठी भाषा लिहिता- वाचता येत असावी. आरटीओकडील अवजड वाहन चालविण्याचा परवाना व पीएसव्ही बॅज आवश्‍यक आहे. याकरिता खुल्या प्रवर्गासाठी उमेदवाराचे वय २४ ते ३८ वर्षे असावे, मागास प्रवर्गासाठी वयात ५ वर्षांची सवलत राहील. शारीरिक पात्रतेमध्ये उंची किमान १६० व कमाल १८० सेमी असावी. दृष्टी चष्माविरहीत असावी. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाकरिता ६०० रुपये व मागास तसेच दुष्काळी भागातील सर्व उमेदवारांकरिता ३०० रुपये शुल्क राहील. चालक, वाहकांसाठी १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित हे प्रत्येकी २५ गुणांसाठी असतील. परीक्षेचा कालावधी दीड तासांचा राहील. 

बारामतीच्या राष्ट्रवादी करिअर अकॅडमीचे समीर मुलाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भातील अधिक माहितीसाठी व अर्जासाठी www.msrtcexam.in व www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT