महाराष्ट्र

दुष्काळी भागांत चारा छावण्या सुरू करा 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यावर दुष्काळाचे सावट दाटले असताना बॅंकेत भरभक्कम रक्कम असलेल्या धार्मिक संस्थांनी दुष्काळी भागात अन्नछत्रे आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, असा आदेश राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी बुधवारी दिला. 

ग्रामीण भागातील धरणांमधील पाणीसाठा निम्म्यावर आला आहे. त्याचा मोठा फटका जनावरांना बसण्याची शक्‍यता आहे. चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे कवडीमोल भावात पशुधन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. धार्मिक संस्थांकडील निधी मात्र बॅंकेत पडून राहतो. या पार्श्‍वभूमीवर धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी हा आदेश दिला आहे. 

धार्मिक संस्थांना त्यांच्याकडील शिल्लक रकमेच्या प्रमाणात अन्नछत्रे आणि चारा छावण्या सुरू कराव्या लागतील, तसेच छावण्यांत किती गुरे असावीत, हे ठरवावे लागेल. त्यावर धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत नियंत्रण ठेवले जाईल. 

या चारा छावण्या पुढील जूनपर्यंत म्हणजे पावसाळा सुरू होईपर्यंत सुरू ठेवाव्या लागतील. एखाद्या जिल्ह्यात दुष्काळ नसेल, तर तेथील धार्मिक संस्थांनी अन्य जिल्ह्यांतील दुष्काळी भागांत चारा छावण्या व अन्नछत्रे उघडावीत. एखादी धार्मिक संस्था शहरात नियमित अन्नछत्र चालवत असेल आणि त्या शहरात दुष्काळ नसला, तर दुष्काळी भागात असे काम करावे लागेल, असे धर्मादाय आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे. 

दुष्काळावर सरकारच्या स्तरावर उपाययोजना केल्या जातील; मात्र समाजासाठी काम करणे हे धर्मादाय संस्थांचे उद्दिष्ट आहे. या संस्थांचा निधी योग्य कारणासाठी वापरण्यास सांगण्याचे अधिकार धर्मादाय आयुक्तांना आहेत, त्यानुसार हा आदेश देण्यात आला आहे. किती अन्नछत्रे व चारा छावण्या सुरू झाल्या, याचा अहवाल देण्यासही संबंधित जिल्ह्यांतील अधीक्षकांना सांगण्यात आले आहे. 

आदेश बंधनकारक 
धार्मिक संस्थांच्या घटनेत चारा छावण्या व अन्नछत्र उघडण्याचा उल्लेख नाही; परंतु धर्मादाय आयुक्तांनी दिलेला हा आदेश हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, जैन, पारसी आदी सर्व धर्मांच्या संस्थांसाठी बंधनकारक राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत जिल्ह्यातील संबंधित अधिकारी मार्गदर्शन करतील, असेही या आदेशात म्हटले आहे. या चारा छावण्या आणि अन्नछत्रांवर होणाऱ्या खर्चावर देखरेख करण्याच्या सूचना संबंधित जिल्ह्यांतील धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT