Gram Sabha, Covid 19, Social Distancing 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात सोशल डिस्टन्सिंग पाळून ग्रामसभा घेण्यास मान्यता

मिलिंद संगई

बारामती : कोरोनाच्या निर्बंधात सर्वच स्तरावर शिथीलता येत असल्याने राज्याच्या ग्रामविकास विभागाने सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाच्या बाबत आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन ग्रामसभा घेण्यास परवानगी दिली आहे. 

ग्रामविकासात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना असलेले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता ग्रामसभांचे पूर्वीप्रमाणे आयोजन होणे गरजेचे आहे, त्या मुळेच राज्य शासनाने ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी दिली आहे. राज्याच्या अनेक भागात उद्या नवीन कारभारी ग्रामपंचायतींचा कारभार हाती घेणार आहेत, या पार्श्वभूमीवर शासनाने ग्रामसभांच्या आयोजनाला दिलेल्या परवानगीचे महत्व वेगळे आहे. 

काळी जादू,करणी झाल्याचे सांगत पावने तीन लाख उकळले; एकास अटक
 
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम सात नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात किमान चार ग्रामसभांचे आयोजन बंधनकारक आहे. असे आयोजन न झाल्यास संबंधित सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुध्द कारवाईची तरतूद आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सामाजिक, राजकीय सभा व संमेलनांवर बंदी आणली होती. ग्रामसभेतही ग्रामस्थांची उपस्थिती व त्या मुळे निर्माण होणारी गर्दी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या दृष्टीने अयोग्य असल्याने ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून स्थिती पूर्ववत होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगसह इतर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य शासनाचे उपसचिव ए.का. गागरे यांनी या बाबतची शासकीय अधिसूचना जारी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan Recovery: थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना

Vastu Tips: धुळीच्या भीतीने घराच्या खिडक्या २४ तास बंद ठेवताय? वास्तूशास्त्रानुसार ओढावू शकतात 'या' ५ मोठ्या अडचणी!

Dharashiv Kirtankar Fight : 'माझी सुपारी का घेतली?'; धाराशिवमध्ये दोन महाराज आपापसात भिडले, थेट हाणामारीनंतर बाल वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर केलं आंदोलन

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT