Mumbai Attack
Mumbai Attack 
महाराष्ट्र

26/11 च्या कॉल रेकॉडबाबत राज्य सरकारची उच्च न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामधील (26/11) कॉल रेकॉर्डची दिशाभूल करणारी माहिती शहीद अशोक कामटे यांच्या पत्नीला दिली गेली. त्या विरोधात माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या चौकशीचे आदेश देण्याच्या राज्य माहिती आयोगाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मारिया यांनीदेखील यामध्ये बाजू मांडण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. 

कामटे यांच्या पत्नी विनिता यांनी पोलिस विभागाकडे 26-11 च्या हल्याबाबत पोलीस कंट्रोल रुममधील कॉल रेकॉर्डची माहिती मागविली होती. प्रारंभी हा तपशील देण्यास पोलिस विभागाने नकार दिला होता. नंतर ही माहिती त्यांना नोव्हेंबर 2009 आणि फेब्रुवारी 2010 मध्ये त्यांना देण्यात आली. मात्र जी कॉल रेकॉर्डची माहिती 26-11 च्या खटल्यात दाखल केलेली आहे आणि जो रेकॉर्ड त्यांना दिलेला आहे यामध्ये प्रचंड तफावत आहे, असे विनिता यांच्या निदर्शनास आले.

याची दखल घेऊन आयोगाने मारिया यांच्यावर चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा ठपका ठेवला आणि चौकशी आयोग कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारला दिले. मात्र राज्य सरकारने याविरोधात न्यायालयात याचिका केली आहे. आयोगाला असे आदेश देण्याचा अधिकार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. सरकारच्या याचिकेत मलाही बाजू मांडायला द्यावी, अशी मागणी मारिया यांनी अर्जाद्वारे केली आहे.

याबाबत बाजू मांडण्याचे निर्देश न्या. ए. ए. सय्यद यांनी आयोगाला दिले असून सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे. मुंबई हल्यात कामटे यांच्यासह हेमंत करकरे, विजय साळसकर हे पोलिस अधिकारी शहीद झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT