महाराष्ट्र

बँकेत भुयार खोदून चोरी करणाऱ्यास वसईत अटक 

सकाळवृत्तसेवा

नालासोपारा : बँक ऑफ बडोदाच्या सानपाडा येथील शाखेतील चोरी प्रकरणात फरारी असलेल्या आरोपीला वसईत अटक करण्यात आली. वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. वालीव परिसरातील अन्य दोन घरफोडींच्या तपासादरम्यान आरोपी संजय बाळू कामडी (वय 30) याने बँक ऑफ बडोदा चोरी प्रकरणातील स्वत:च्या सहभागाची कबुली दिली. 

कामडी हा वसईच्या फादरवाडी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्यासह विनोदकुमार हिरालाल सिंघवी याला वालीव परिसरातील दोन घरफोडीप्रकरणी अटक केली. या दोघांकडून सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान कामडी याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बँक ऑफ बडोदाच्या सानपाडा येथील शाखेत भुयार खोदून चोरी केल्याचे कबूल केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी ही माहिती दिली. कामडी याला 26 ऑक्‍टोबरला सापळा लावून अटक करण्यात आली होती. 

मोकासह विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद 
आरोपी कामडी याच्यावर मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, गुजरात यांसह अनेक ठिकाणी मोकासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी त्याची अटक महत्त्वाची होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT