IMD Arabian sea
IMD Arabian sea 
महाराष्ट्र

अरबी समुद्रात वादळाचे संकेत; मुसळधार पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून बुधवारी त्याचे वादाळात रुपांतर होणार आहे. हे वादळ राज्याच्या किनारपट्टीला थेट धडकणार नसले तरी बुधवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी 65 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. तसेच समुद्रही खवळणार असल्याने मंगळवारपासून तीन दिवस मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. 

सिंधुदूर्गपासून रायगडात मुसळधार पावसाला सुरुवात होईल. ठाणे, मुंबई व पालघरमध्ये मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाच्या सरींचा प्रवेश होईल. राज्याच्या किनारपट्टीपासून 300 किलोमीटरवर कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव आहे. केरळ आणि कर्नाटक दरम्याच्या खोल समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बुधवारपर्यंत या कमी दाबाच्या पट्ट्याचे वादळात रुपांतर होणार असून ते पाकिस्तानच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे हे वादळ राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार नाही. मात्र, त्यामुळे सिंधुदूर्गपासून रायगडपर्यंत मुसळधार पाऊस पडेल. तर ठाण्यापासून मुंबई, पालघरपर्यंत मेघगर्जनेसह पूर्व मोसमी पाऊस पडेल. असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

मान्सून उद्या केरळ आणि तमिळनाडू आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांत प्रवेश करेल. राज्यात सध्या दक्षिण कोकणात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. परंतु पुढील चार दिवसांत दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा केंद्रीय वेधशाळेने वर्तवला आहे. या वादळातील आर्द्रतेचे प्रमाण पुरेसे असल्याने किनारपट्टीत पूर्वमोसमी पावसाचा जोर चांगला राहील. सध्या हा कमी दाबाचा पट्टा राज्यापासून तीनशे किलोमीटर लांब आहे, परंतु मंगळवारपासून दक्षिण महाराष्ट्रात ताशी साठ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. 

पुढील पाच दिवसांतील संभाव्य वादळाची वाटचाल 
10 जून (सोमवार) ला लक्षद्वीपचा आग्नेयकडील भाग, केरळ आणि कर्नाटकात 60 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील. या भागांत तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. 
11 जून (मंगळवार) ला लक्षद्वीपचा आग्नेय भाग, केरळ आणि कर्नाटकात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होईल. या भागांत 75 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील. रायगड आणि रत्नागिरीत मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहेल. पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळतील. 

12 जून (बुधवार) ला केरळ व कर्नाटकातून अरबी समुद्रातील वायव्य दिशेकडे सरकणाऱ्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर वादळात होईल. महाराष्ट्र किनारपट्टीपासून 65 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील. रत्नागिरी व रायगडात मुसळधार पावसाला सुरुवात होईल. मुंबई व पालघरमध्ये मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाच्या सरींचा प्रवेश होईल. 
13 जून (गुरुवार) ला पाकिस्ताव व गुजरातदरम्यानच्या अऱबी समुद्रात एकशे दहा किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील. डहाणू व पालघरवरुन 75 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील. मुंबई, पालघरमध्ये मेघगर्जनेसह पाऊस असेल. 

हे वादळ राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार नाही. मात्र, अरबी समुद्रातातून पाकिस्तानकडे सरकताना किनारपट्टीच्या समांतर दिशेने जाईल. त्यामुळे समुद्र खवळलेला असेल. तसेच वाऱ्याचा वेगही जास्त असेल.

- के. एस. होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान विभाग

या वादळामुळे दक्षिण कोकणापर्यंत मान्सून प्रवेशासाठी पुरेशी आर्द्रता मिळेल, त्यामुळे बारा तारखेपर्यंत दक्षिण कोकणातील मान्सूनचे आगमन जवळपास निश्‍चित होईल. 

- डॉ. शिवानंद पै, प्रमुख, पुणे वेधशाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT