महाराष्ट्र बातम्या

कास्ट व्हॅलिडीटीसाठी विद्यार्थ्यांच्या अर्जांचा ढीग! राज्यात ३६ समित्यांसाठी अवघे ४ अध्यक्ष; सोलापूरच्या विद्यार्थ्यांची प्रकरणे अध्यक्षांच्या स्वाक्षरीसाठी पाठविली मुंबईला

सध्या ‘सीईटी’साठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली असून, फेब्रुवारीत ‘नीट’साठी नोंदणी सुरू होईल. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्ह्याच्या जात वैधता समित्यांकडे विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. सध्या डिसेंबर २०२४ ते २३ जानेवारी २०२५ या काळातील सुमारे २८ हजार प्रकरणांचा ढीग राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या समित्यांपुढे पडला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सध्या ‘सीईटी’साठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली असून, फेब्रुवारीत ‘नीट’साठी नोंदणी सुरू होईल. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्ह्याच्या जात वैधता समित्यांकडे विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. सध्या डिसेंबर २०२४ ते २३ जानेवारी २०२५ या काळातील सुमारे २८ हजार प्रकरणांचा ढीग राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या समित्यांपुढे पडला आहे. पण, ३६ समित्यांसाठी अवघे चार अध्यक्ष असल्याने दिवसेंदिवस पेन्डन्सी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह नोकरदार, राजकारणींना जात प्रमाणपत्र पडताळणी बंधनकारक आहे. शासनाने गतवर्षी व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने दोनदा मुदतवाढ दिली. पण, आता २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी वाढत असल्याने राज्यातील ३६ समित्यांच्या चार अध्यक्षांना सुटीतही शेकडो प्रकरणांवर स्वाक्षऱ्या कराव्या लागत आहेत.

‘निर्णय वेगवान, गतिमान महाराष्ट्र’ असे ब्रीदवाक्य असलेल्या महायुती सरकारच्या महसूल विभागाकडे अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या (सिलेक्शन ग्रेड) पदोन्नतीची फाइल प्रलंबित आहे. त्यावर जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना पूर्णवेळ अध्यक्ष, सदस्य मिळणारच नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे.

समितीसाठी मिळतील निश्चितपणे पूर्णवेळ अध्यक्ष

सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दररोज सरासरी १२५ ते १४० प्रकरणे दाखल होत आहेत. समितीकडे डिसेंबरअखेर ३१०० प्रकरणे आणि जानेवारी २०२५ मधील जवळपास १६०० प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यातील काही प्रकरणांमध्ये त्रुटी असून, काहींमध्ये कागदपत्रे अपूर्ण आहेत. परिपूर्ण प्रकरणांवर लवकरच अध्यक्षांच्या स्वाक्षरी होतील असे नियोजन केले आहे.

- सचिन कवले, सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर

एका अध्यक्षाकडे १० जिल्ह्यांची जबाबदारी

सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची जबाबदारी रविराज फल्ले यांच्यावर सोपविण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्याकडे मुंबई उपनगर, मुंबई शहर, सोलापूर, पालघर, सातारा, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली व सिंधुदुर्ग अशा १० जिल्ह्यांच्या समित्यांचा पदभार आहे. त्यांच्याकडे नव्याने सोलापूरच्या समितीची पदभार सोपवून १५ दिवस झाले, पण अद्याप ते सोलापूरला आले नाहीत. याशिवाय सांगली समितीचे सदस्य नागनाथ चौगुले यांच्याकडे सोलापूरच्या समितीचे सदस्य म्हणून अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे आता एक हजार प्रकरणे मुंबईला पाठवून स्वाक्षरी आणण्याची तयारी समितीच्या सदस्यांनी केली आहे.

‘जात वैधता’ची सद्य:स्थिती

  • एकूण समित्या

  • ३६

  • समित्यांसाठी अध्यक्ष

  • दररोज सरासरी दाखल अर्ज

  • ४,५००

  • सद्य:स्थितीत अंदाजे प्रलंबित प्रकरणे

  • २८,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT