इथेनॉल उत्पादन
इथेनॉल उत्पादन Sakal
महाराष्ट्र

उसाच्या रसावर प्रक्रिया करून वर्षभर इथेनॉल उत्पादन शक्य

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उसाच्या रसावर विशिष्ट प्रक्रिया करून वर्षभर इथेनॉल उत्पादन करता येईल, असे ‘बायोसिरप’ तयार करण्याचे नवतंत्रज्ञान ‘प्राज’ बायोटेक कंपनीने विकसित केले आहे. या संदर्भात ‘प्राज’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी मंगळवारी घोषणा केली. ‘प्राज’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक शिशीर जोशीपुरा, जैव ऊर्जा विभागाचे अध्यक्ष अतुल मुळे, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स विभागाचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र उटगीकर या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

डॉ. चौधरी म्हणाले, उसाचा रस हा नाशवंत पदार्थ असून, तो २४ तासांपेक्षा अधिक काळ साठवून ठेवता येऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर उसाच्या रसावर विशिष्ट प्रक्रिया करून त्याचे सिरपमध्ये रूपांतर करण्याचे स्वतःचे नवतंत्रज्ञान ‘प्राज’ने विकसित केले आहे. हे सिरप साधारणपणे १२ महिन्यांपर्यंत टिकते. त्यामुळे गाळप हंगाम संपल्यानंतरही कारखान्यांना हे सिरप वापरून पुढील वर्षभर इथेनॉलचे उत्पादन करणे शक्य होणार आहे. यातून इथेनॉलचे उत्पादन वाढणार असून, कारखान्यांना अतिरिक्त महसूल मिळून ते आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनतील. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनेही ‘प्राज’च्या बायोसिरप तंत्रज्ञानावर मान्यतेची मोहोर उमटवली आहे.

कराड (जि. सातारा) जवळ जयवंत शुगर्स येथे बायोसिरप तंत्रज्ञानाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाल्याचे त्यांनी सांगितले.

साखरेचा अतिरिक्त शिल्लक साठ्यामुळे साखर कारखान्यांचे पैसे अडकून पडले आहेत. पुढील १२ ते २४ महिन्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. उसाच्या रसापासून बायोसिरप आणि त्यापासून इथेनॉल निर्मिती हाच खालावलेली आर्थिक स्थिती सुधारण्याचा दीर्घकालीन शाश्वत मार्ग साखर कारखान्यांपुढे आहे. साखर क्षेत्रामध्ये अभिनव बदल घडवून आणण्याची ताकद या बायोसिरप तंत्रज्ञानात आहे.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त

साखर उद्योगाच्या दृष्टीने ही महत्त्वाची आणि दिलासा देणारी घटना आहे. साखर कारखान्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेलच, शिवाय त्यांची आर्थिक स्थितीही या तंत्रज्ञानामुळे सुधारेल. इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याच्या ध्येयपूर्तीसाठी ‘कुठेही, केव्हाही इथेनॉल’ या उक्तीला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी बायोसिरप महत्त्वाची भूमिका निभावेल.

- डॉ. प्रमोद चौधरी, संस्थापक अध्यक्ष- प्राज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT