Mumbai
Mumbai 
महाराष्ट्र

मंत्रालयात तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न (व्हिडिओ)

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन या तरुणाने उडी मारली, मात्र सुदैवाने खाली लावलेल्या संरक्षक जाळ्यांमध्ये हा तरुण अडकला आणि त्याचे प्राण बचावले.

आज (ता.07) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. लक्ष्मण चव्हाण असे उडी मारणाऱ्या तरुणाचे नाव असल्याची माहिती असून तो प्रजासत्ताक भारत पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे मंत्रालयात काही वेळासाठी गोंधळाचं वातावरण होतं, पण थोड्याच वेळात अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांच्या मदतीनं या तरुणाला जाळीवरुन सुरक्षित खाली उतरवण्यात आलं आहे.

मंत्रालयात विषप्राषन करून शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण आता कुठे निवळत असताना पुन्हा एकदा हा प्रकार घडल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सध्या त्या तरूणाकडे या प्रकरणी चौकशी केली जात आहे. या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळालेली नसून पोलिस यासंबंधी कसून चौकशी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT