uddhav thackeray and eknath shinde
uddhav thackeray and eknath shinde esakal
महाराष्ट्र

Shivsena : ठाण्यात शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर; पोलिस बंदोबस्त तैनात

सकाळ डिजिटल टीम

ठाणेः ठाण्यामध्ये शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. शाखा ताब्यात घेण्यावरुन हा वाद पेटला. शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. तीरीही दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे गटाकडून अधिकृतपणे शिवसेनेचं नाव वापरलं जातं. त्यामुळे त्यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते ठिकठिकाणच्या शाखा ताब्यात घेण्यासाठी आक्रमक होतांना दिसत आहेत.

हेही वाचाः परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने शिंदे गटाचा व्हिप लागू होणार नाही, असा निकाल देत पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे. तरीही शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप बजावला. आम्ही फक्त व्हिप बजावला, कारवाईचं दोन आठवड्यांनी बघू, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली होती.

त्यानंतर आज ठाण्यामध्ये शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. ठाण्यातल्या शिवाई नगर शाखेवरुन हा वाद पेटला. हा सत्तेचा गैरवापर होत असल्याची प्रतिक्रिया खासदार राजन विचारे यांनी दिली आहे. घटनास्थळी सध्या मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

ही शाखा आमचीच असून प्रताप सरनाईक यांनी बांधली आहे. येथील नगरसेवक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे इतर कुणीही त्यावर दावा करु शकत नाहीत, असं शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT