Jayant Patil
Jayant Patil Sakal
महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायाललयाने निकाल दिला तर; राज्य सरकार कोसळेल : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा

देशात न्याय व्यवस्था असेल तर; आमचा विजय होईल. १० व्या सूचीप्रमाणे ज्यांनी पक्ष व्हीप विरोधात काम केले ते अपात्र ठरतील. पहिल्या १६ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्यामुळे तेही अपात्र ठरतील व सरकार कोसळेल.

पिंपरी - देशात न्याय व्यवस्था असेल तर; आमचा विजय होईल. १० व्या सूचीप्रमाणे ज्यांनी पक्ष व्हीप विरोधात काम केले ते अपात्र ठरतील. पहिल्या १६ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्यामुळे तेही अपात्र ठरतील व सरकार कोसळेल. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करुन निवडणुका घेणे हा पर्याय राहिल, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी (ता. २६) पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा पक्ष सदस्य नोंदणीच्या कार्यकर्ता व पतदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीसाठी काळेवाडी येथे आले असताना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शाम लांडे, विनोद नढे, पंकज भालेकर, विनायक रणसुभे प्रा. कविता आल्हाट आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, देशात न्याय व्यवस्था शिल्लक असेल तर; १० व्या सूचीप्रमाणे ज्यांनी पक्षाच्या व्हीपच्या विरोधात मतदान केले त्यांचे अपात्र होणे हे नैसर्गिक आहे. आता न्याय द्यायचाच नसेल तर तो लांबणीवर टाकणे हा दुसरा पर्याय आहे. त्यामुळे तो लांबणीवर टाकला जावू शकतो. आम्हलाही हे कुतूहल आहे, या देशात सर्वोच्च न्यायालय कसे वागतेय. त्यांनी जी कार्यवाही घेतली आहे. त्यामुळे देशातील जनतेचा न्याय व्यवस्थेवर विश्‍वास राहणार का नाही, याचाही निर्णय त्याबरोबर होईल.

अजित पवार नाराज वगैरे काही नाही. ते आमच्याशी जास्त बोलतात की बावनकुळेंशी. आपणाला मंत्रीपद मिळाले नाही याची चिंता त्यांनी करावी, असे बोलून पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांच्यावर आमचा पुर्ण विश्‍वास आहे. त्यांचे विचार आम्हाला माहित आहेत. ते कोणाशी बोलले, भेटले यावर कोण कोठे जाईल, असे वाटत नाही.

‘तानाजी सावंत यांचे वक्तव्य म्हणजे मस्ती वाढली’

मराठा समाजाबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले की, त्यांचे वक्तव्य अत्यंत गंभीर आहे. मराठा समाज प्रचंड संतापलेला आहे. त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीसच बोलत आहेत. त्यांना पुर्ण परवानगी दिली आहे, असे वाटते. आम्ही त्यांचा निषेथ करतो. थोडक्यात काय ‘जरा मस्ती वाढली’ आहे.

भाजपची सत्ता असताना पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणे धक्कादायक : जयंत पाटील

भाजपची सत्ता असताना पुणे येथे पीएफआयच्या कार्यकर्ते पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत असतील तर; गंभीर बाब आहे. गुप्तचर विभागाचा अहवाल हवा. राज्य सरकारचे लक्ष नसलत्यामुळे ते धजावले. अशा लोकांची देशभर धरपकड होते. महारष्ट्र पोलीसांना ही माहिती हवी होती. राज्य सरकार म्हणतेय आम्ही दखल घेवू. आमची मागणी आहे. त्यांनी खरेच दखल घ्यावी, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

महापालिका निवडणुका तोंडावर आहेत असे आपण म्हणतोय पण; हे सरकार निवडणुकांना घाबरत आहे. एनकेण प्रकारे निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत. जनमत विरोधात गेले आहे, हे त्यांना माहिती आहे. आमच्या मागणी लवकर घ्या. लोकबरोबर असतील तर; तीनचा प्रभाग होवू वा चारचा फार फरक पडत नाही. त्यांनी कशी कामे केली यावर अवलंबून. मला विश्‍वास आहे महापालिकांमध्ये आमचीच सत्ता येईल.

- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT