swastha bharat yatra
swastha bharat yatra 
महाराष्ट्र

राज्यात 18 ते 24 ऑक्टोबर 'स्वास्थ भारत यात्रा'

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून संपूर्ण भारतात आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने शाश्वत सामाजिक बदल घडविण्यासाठी आयोजित केलेली 'स्वास्थ भारत यात्रा' यशस्वी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (एफएफएएसआय), नवी दिल्ली यांनी सुरु केलेली 'इट राइट इंडिया' चळवळ जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी 'स्वास्थ भारत यात्रा' चे देशात 16 ते 27 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. 'स्वास्थ भारत यात्रा' बाबत माहिती देण्यासाठी एम. सी. ए. क्रिकेट क्लब बीकेसी, वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, एफएफएएसआयचे महाराष्ट्र विभागीय संचालक मुथ्थूमारन, दिल्ली येथील सहायक संचालक अखिलेश गुप्ता, एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जगमीत मदान, एएफटीएसआय संस्थेचे अध्यक्ष प्रबोध हलदे, अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त सी. बी. पवार आदींसह राज्यभरातील सहआयुक्त, सहायक आयुक्त यावेळी उपस्थित होते.

यावेळी . बापट म्हणाले, एफडीए ने काल ऑनलाईन अन्न पदार्थ पुरवठा धारकांना अन्नपदार्थ पुरविणाऱ्या 113 आस्थापनांवर कारवाई केली. एकीकडे गरीब जनतेला एकवेळचे अन्न मिळण्यास अडचण येते. तर अन्न भेसळ करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अशा परिस्थितीत भेसळ करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. 'स्वास्थ्य भारत यात्रा' ही जनतेला चांगल्या अन्नाबाबत जागृती करण्याचे साधन ठरणार आहे. या यात्रेत एफडीए, एनसीसी यासह सर्वच प्रशासन तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे. अन्नाबाबतची जागृती ही यात्रेपुरती मर्यादित न राहता निरंतर राहावी, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रास्ताविकात डॉ. दराडे म्हणाल्या, स्वास्थ भारत यात्रेमध्ये स्वास्थ मेळावे, अन्न चाचणी, प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, पोस्टर स्पर्धा आदी कार्यक्रमांचे संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येत आहे. स्वास्थ भारत यात्रेची प्रत्यक्ष सुरुवात जागतिक अन्न दिनाच्या पूर्वसंध्येला ता.16 ऑक्टोबर रोजी होणार असून त्यामध्ये सहभागी होणारे संपूर्ण प्रवास सायकल वरून करणार आहेत. यात्रेसाठी संपूर्ण देशात एकूण 6 मार्ग बनवले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 3 मार्गांचाही समावेश आहे. महाराष्ट्रात 18 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे. प्रत्येक ट्रॅकवर साधारण 25 सायकलपटू असणार आहेत. हे सायकलपटू 50 ते 60 कि.मी. अंतर पूर्ण करुन प्रत्येक टप्प्यात 2 ते 3 गावात आरोग्यविषयक जनजागृती करणार आहेत व महाराष्ट्रातील 33 ठिकाणी भेटी देणार आहेत आणि पुढील सायकल पथकाला रिले बॅटन सुपूर्द  करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT