Teacher
Teacher 
महाराष्ट्र

शिक्षक भरतीला राज्यात प्रारंभ

राजेंद्र पाटील

कोल्हापूर - महाराष्ट्रात शिक्षक भरती प्रक्रियेला सुरवात झाली आहे. सुमारे १२ हजार शिक्षक पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत आहे. राज्यात तब्बल नऊ वर्षांनंतर शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे.

राज्यात डीएड व बीएड बेरोजगार उमेदवारांची संख्या सुमारे सात लाखांपर्यंत आहे. सरकारी व खासगी शाळांत शिक्षकांची सुमारे २५ हजारांवर पदे रिक्त आहेत, परंतु या वर्षी केवळ ५० टक्केच म्हणजे बारा हजार पदे भरली जाणार आहेत. शिक्षक भरतीसाठी शासनाने सहा वर्षांत पाच टीईटी परीक्षा घेतल्या.

या परीक्षेत सुमारे सहा लाखांवर उमेदवार बसले होते. एक लाख ९८ हजारांवर शिक्षकच टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले, त्यानंतर अभियोग्यता चाचणी झाली. टीईटी परीक्षा व अभियोग्यता चाचणी दिलेले उमेदवारच पवित्र पोर्टलला प्राधान्यक्रम भरू शकतात.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी शासनाने शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली; परंतु प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला आता सुरवात झाली आहे.राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, त्याठिकाणी उमेदवारांची परीक्षेतील गुणवत्तेवर थेट निवड होईल. खासगी शैक्षणिक संस्थेत शासनाने पाठविलेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊनच भरती केली जाणार आहे.

शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध होताच काही उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. मात्र शासनाने भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. पवित्र पोर्टल सुरू केल्यानंतर प्राधान्यक्रम लिहिताना शिक्षकांना विविध तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पवित्र पोर्टलवर शाळांचे प्राधान्यक्रम देताना उमेदवारांना विविध तांत्रिक अडचणी येत आहेत. या तांत्रिक अडचणी प्रशासनाने दूर कराव्यात. प्राधान्यक्रम निवडल्यानंतर उमेदवारांना शाळावर त्वरित नियुक्ती द्यावी. 
- संतोष मगर, राज्याध्यक्ष, डीएड व बीएड स्टुडन्ट असोसिएशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT