महाराष्ट्र

Loksabha 2019: काँग्रेसची दहावी यादी जाहीर; पुण्याचा घोळ काही सुटेना!

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची आज (सोमवार) दहावी यादी जाहीर केली आहे. या यादीतही पुण्याच्या उमेदवाराचा समावेश नाही. पुण्याच्या उमेदवाराचे अद्यापही काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेले नाही. काँग्रेसने आज जाहीर केलेल्या 26 उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रतील केवळ एका उमेदवाराचा समावेश असून मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांचा समावेश आहे.

संजय निरूपम हे वायव्य मुंबई मतदारसंघातून निवडणुक लढवतील. ही जागा युतीत शिवसेनेला सुटलेली असून शिवसेनेकडून या मतदारसंघात गजानन किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता कांग्रेसकडून संजय निरूपम यांना उमेदवारी जाहीर झाल्याने निरूपम आणि गजानन किर्तीकर यांच्यात थेट लढत आपल्याला पहायला मिळणार आहे.
 
दरम्यान, मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून संजय निरूपम यांची उचलबांगडी करण्यात आली असून मिलींद देवरा हे मुंबई काँग्रेसचे आता नवे अध्यक्ष असणार आहेत. दरम्यान, पुण्यात भाजपकडून मंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी प्रचाराला सुरवातही केली आहे. तरी, काँग्रेसचा पुण्यातील उमेदवार ठरत नसल्याने राजकीय चर्चांना मात्र उधाण आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT