बेपत्ता महिला
बेपत्ता महिला Sakal
महाराष्ट्र

शेळ्या चारायला गेलेल्या कवठे गावच्या महिला सरपंच बेपत्ता

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : शेळ्या चारायला गेलेल्या कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावच्या महिला सरपंच जैतुनबी शेख (वय ६०) या बुधवारपासून (ता. ७) बेपत्ता झाल्या आहेत. सलगर वस्ती पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, पण अद्याप त्यांचा तपास लागलेला नाही.

पावणेपाच वर्षांपूर्वी गावच्या सरंपचपदाची जबाबदारी जैतुनबी शेख यांच्या खांद्यावर आली. बुधवारी त्या शेळ्या चारायला घेऊन गेल्या होत्या. दुपारी १२ च्या सुमारास त्या बेपत्ता झाल्या. त्यांच्या पतीसह दोन मुलांनी त्यांचा इतरत्र शोध घेतला. नातेवाईकांकडे चौकशी केली, तरीपण त्याठिकाणी आल्या नसल्याचे नातलगांनी सांगितले. विहिरीत पडल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्या विहिरीतील सगळे पाणी उपसले. पण, काहीच हाती लागले नाही. त्यांना पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुलांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सचिन मंद्रपूकर यांनी जैतुनबी यांचा शोध सुरु केला. कुटुंबातील सदस्यांचे जबाब घेतले. आठवडा, महिन्यापूर्वी कौटुंबिक कारणातून काही वादविवाद झाले होते का, गावातील कोणाशी भांडण होते का, याचीही माहिती घेतली. पण, पोलिसांना ठोस काहीच मिळाले नाही. बेपत्ता महिला सरपंचांच्या शोधासाठी पोलिस वेगवेगळ्या बाजूंनी तपास करीत आहेत. त्या मोबाइल वापरत नसल्याने पोलिसांना त्यांचा शोध घेणे आव्हान बनले आहे.

चप्पल मिळाल्याने बोलावले डॉग स्कॉड

चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या महिला सरपंच जैतुनबी यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. रविवारी (ता. ११) पोलिसांना त्या शेळ्या चारत असलेल्या ठिकाणी त्यांची चप्पल आढळली. त्यांच्या मुलांनी आईचीच चप्पल असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक श्री. मंद्रपूकर यांनी डॉग स्कॉडला पाचारण केले. पण, काही अंतरावर जाऊन डॉग स्कॉड घुटमळले. पोलिसांना पुन्हा माघारी परतावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT