solapur Heatwave
सोलापूर : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूरचा पारा ४० अंशांवर पोचल्याने जिल्हा रुग्णालयात उष्माघात प्रतिबंधक कक्ष सुरू करण्यात आला आहे. संभाव्य उष्माघात रुग्णांसाठी पाच खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने पुढील तीन दिवसात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूरमध्ये तापमान सतत वाढत आहे. यामुळे नागरिकांना सकाळी आठनंतर घराबाहेर पडणे कठीण झाले असून, सायंकाळी तापमान काही प्रमाणात कमी होत आहे. रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे.
अशी काळजी घ्या...
हायड्रेशन : पाण्याचे प्रमाण भरपूर ठेवा, तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. लिंबू सरबत, ताक, शहाळ्याचे पाणी, आमसुलाचे सार किंवा घरगुती पन्हे रोज प्यावे. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि जास्त साखर असलेली पेये टाळावीत, कारण यामुळे शरीरातील पाणी कमी होते.
आहार : पचायला हलके आणि ताजे अन्न खा. जास्त तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळा. पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे (कलिंगड, संत्री, द्राक्षे) आणि भाज्या (काकडी, दुधी भोपळा) आहारात ठेवा.
विहार : दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो कडक उन्हात बाहेर जाणे टाळा. बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा. त्वचेवर सनस्क्रीन लोशन लावा. सैल, हलके आणि सुती कापड वापरा.
उष्माघाताची लक्षणे
चक्कर येणे, मळमळणे
तीव्र डोकेदुखी
खूप घाम येणे किंवा स्नायूंमध्ये पेटके येणे
जिल्हा रुग्णाालयात उष्माघाताचा कक्ष
अचानक झालेल्या तापमानवाढीमुळे उष्माघाताच्या संभाव्य रुग्णांसाठी गुरुनानक नगरातील जिल्हा रुग्णालयात कक्ष सुरू करण्यात आला आहे. पाच खाटा अशा रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी उन्हात काळजी घ्यावी.
- डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.