Sakal
Sakal
महाराष्ट्र

प्रदूषणाचा विळखा कायम

CD

पुढील दोन दिवसानंतर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

पुणे - पुढील दोन दिवसानंतर मराठवाडा (Marathwad) आणि विदर्भात (Vidarbha) तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस (Rain) आणि गारा (Hail) पडण्याचा अंदाज हवामान (Environment) विभागाने दिला आहे. सध्या सक्रिय असलेल्या पश्‍चिमी चक्रावात आणि त्याच्या चक्राकार वाऱ्यांमुळे हरियाना, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश या भागात पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. परिणामी राज्यात ही पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढला होता. त्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली नोंदला जात होता. मात्र आता उत्तर भारतातील थंडी कमी झाल्याने राज्यातही थंडीचा कडाका कमी होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात मंगळवारपासून (ता. २८) कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर पुढील पाच दिवस संपूर्ण देशात थंडीची लाट नसेल.

राज्यात शनिवारी सर्वाधिक कमाल तापमान ३३.१ अंश सेल्सिअस सोलापूर तर नीचांकी तापमानाची नोंद १०.४ अंश सेल्सिअस जळगाव येथे झाली. पुणे शहर आणि परिसरात येत्या दोन दिवसानंतर ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस शहरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. शहरात शनिवारी १२.८ अंश सेल्सिअस किमान तर ३२.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

गेल्या चार दिवसांपासून किमान तापमानात चढ-उतार कायम आहे. रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. मात्र दिवसा ऊनाचा चटका ही कायम आहे. परंतु पुढील काही दिवस थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता आहे.

पुणे परिसरात ढगाळ वातावरण

हवामान विभागाच्या माहितीनुसार सोमवारपासून शहर आणि परिसरात दुपारनंतर आकाश सामान्यतः ढगाळ (५५ ते ७५ टक्के) राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारादेखील वाढेल. त्यामुळे पुण्यातील काही भागात किमान तापमान १५ तर काही ठिकाणी २० अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT