PM मोदींच्या बूस्टर डोसच्या घोषणेचं CM ठाकरेंकडून स्वागत; म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना तीन मोठ्या घोषणा केल्या.
Uddhav Thackeray and PM Modi
Uddhav Thackeray and PM ModiGoogle

मुंबई : पतंप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना संबोधित करताना केलेल्या बूस्टर डोसच्या (Booster Dose) घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्वागत केलं आहे. मोदींच्या या निर्णयाला पाठिंबा देताना त्यांनी ट्विट केलं. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला याबाबत पत्र लिहून विनंती केल्याचं आवर्जून सांगितलं. (CM Uddhav Thackeray welcomes PM Modi announcement of Corona booster dose)

मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्याच्या घोषणेचं स्वागत आहे.यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ७ डिसेंबर रोजी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून मुलांसाठी लसीकरण तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केली होती.

याशिवाय १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु केल्यानं विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्‍चित मदत होईल. तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Uddhav Thackeray and PM Modi
PM मोदींची ख्रिसमस भेट; मुलांचं लसीकरण, बूस्टर डोसची घोषणा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री उशीरा देशाला संबोधित केलं. आपल्या संदेशातून त्यांनी यावेळी तीन मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांचं ३ जानेवारी २०२२ पासून लसीकरण सुरु होणार तसेच १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर्सना बूस्टर डोस देण्यात येणार आणि १० जानेवारीपासूनच ६० वर्षांवरील नागरिकांना ज्यांना गंभीर स्वरुपाचे आजार आहेत त्यांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, बूस्टर डोस घेता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com