महाराष्ट्र

'उदयनराजेंच्या बालिश चाळ्यांंना पवारांनी पाठिशी घातलं'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज, सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. पण, निर्णय होत नव्हता. आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थित अखेर उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

अखेर भाजप प्रवेश?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ उतरवून उदयनराजे भोसले यांनी हातात कमळ घेतले. पण, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना अर्थातच त्यांचा हा निर्णय रुचलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दोन आठवड्यांपूर्वी उदयनराजे भोसले यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, ‘मावळा राजेंचं मन वळवण्यात अपयशी ठरला,’ असे सांगत खासदा कोल्हे यांनी उदयनराजे पक्ष सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेस न सोडण्याची विनंती केली होती. पण, उदयनराजे यांनी पक्ष सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.

पवारसाहेब काय मिळालं?
काल रात्री उदयनराजे भोसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले. आज, सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कळवा-मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी उदयनराजेंच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. उदयनराजे भाजपमध्ये गेले असले तरी, ‘यशवंतरावांचा सातारा, शरद पवारांचा बालेकिल्ला,’ असा टोला आमदार आव्हाड यांनी लगावला आहे. आव्हाड यांनी म्हटले आहे की, साहेब (शरद पवार) उदयनराजेंवर तुम्ही मनापासून प्रेम केलं. त्यांच्यासाठी साताऱ्यातल्या आपल्या जवळच्यांना दुखावलं. त्यांच्या आचरट, बालिश चाळ्यांना कायम पाठिशी घातलं. पोटच्या पोरासारखं त्यांच्यावर प्रेम केलं. काय मिळालं साहेब?, असा प्रश्न त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT