महाराष्ट्र

गडकिल्ले भाड्याने देण्याबाबत उदयनराजे म्हणाले...

वृत्तसंस्था

मुंबई : राज्य सरकारकडून ऐतिहासिक गडकिल्ले भाड्याने देण्याचे धोरण आखले. त्यावर आता भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी यावर वक्तव्य केले. ते म्हणाले, गडकिल्ले भाड्याने देणे यात काहीही चुकीचे वाटत नाही. पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, असेही उदयनराजे म्हणाले. 

उदयनराजे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की गडकिल्ले भाड्याने उपलब्ध करुन देण्याच्या धोरणावर माध्यमांनी चुकीचे वळण दिले. मी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी या विषयावर चर्चा केली असून, मला त्यांनी सरकारचे हे धोरण पूर्णपणे समजावून सांगितले. सरकारच्या धोरणात किल्ल्यांचा काही भाग लग्न समारंभास भाड्याने द्यावा, असे म्हटले. त्यामुळे मला यामध्ये काहीही चुकीचे वाटत नाही. 

तसेच ते पुढे म्हणाले, हेरिटेज टूरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील 25 किल्ल्यांची निवड केली आहे. त्यामुळे हे किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर भाड्याने देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT