Sharad-Pawar
Sharad-Pawar 
महाराष्ट्र

उदयनराजे यांना आमदारांचा विरोध नाही - शरद पवार

सकाळवृत्तसेवा

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यात जाहीर केले. आमदारांच्या बैठकीबाबत माध्यमातून जी माहिती आली त्याचे मलाही आश्‍चर्य वाटले, असेही पवार यांनी सांगितले. त्यामुळे खासदार उदयनराजे आणि ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांमध्ये उमेदवारीवरून वाद नसल्याचेच त्यांनी स्पष्ट केले. 

खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीच्या विषयावरून गेले काही दिवस पक्षात चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातील ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांनी सोमवारी पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेतली होती. साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी न देण्याची मागणी आमदारांनी त्यांच्याकडे केल्याचे सांगण्यात येत होते. या घडामोडींनंतर उदयनराजे यांनीही पवार यांची पुण्यात भेट घेऊन आपली भूमिका मांडली. या पार्श्‍वभूमीवर पक्षातील आमदार-खासदारांच्या वादाबाबत पवार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीनिमित्त पुण्यात होते. तेव्हा, माध्यमाच्या प्रतिनिधींनी त्यांना उदयनराजेंच्या विषयाबाबत प्रश्‍न विचारले. 

पवार म्हणाले, ‘‘उदयनराजे यांच्या उमेदवारीला एकाही आमदाराने विरोध केलेला नाही. सर्वजण मिळून पुढील आठ दिवसांत यावर निर्णय घेऊ. त्यासाठी सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष यांच्यासह लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांची बैठक होईल त्या वेळी सविस्तर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर आगामी निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडेल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SCROLL FOR NEXT