Narendra Modi and Uddhav Thackeray
Narendra Modi and Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : ‘मोदीगेट’मुळे भाजपची सत्ता येणार नाही

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांचे बिंग फोडले नसते तर भाजपचे ‘मोदीगेट’ समोर आले नसते. ‘मोदीगेट’ हा जगातला सर्वात मोठा गैरव्यवहार आहे. सर्वोच्च न्यायालयाने पर्दाफाश केला नसता तर ‘चंदा दो आणि धंदा लो’, हे काम पुढेही सुरू राहिले असतं. सर्वोच्च न्यायालयामुळे हे उघड झाल्याने आता त्यांची सत्ता येणार नसल्याचा दावा करत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला.

दादरमध्ये शिवसेना भवनमध्ये शिवसेनेची पत्रकार परिषद मंगळवारी झाली. त्याच उद्धव ठाकरे बोलत होते. निवडणूक रोख्यांबाबत विरोधी पक्षांना पश्चात्ताप होईल असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यावर ‘हे आधी का लक्षात आले नाही म्हणून विरोधी पक्षांना पश्चात्ताप नक्कीच होईल,’ असा टोला ठाकरे यांनी मारला.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांविषयी ठाकरे म्हणाले, ‘‘मी त्यांचे अभिनंदन करतो. कारण मोदींना विरोधी पक्षात कोणी भ्रष्ट असलेले चालत नाही. सगळेच भ्रष्ट ते स्वतःकडे घेत आहेत हे चांगले आहे. ‘व्हॅक्यूम क्लीनर’ सारखे धूळ गोळा करण्याचे काम भाजप करीत आहे.’

राज्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे दौरे सातत्याने होत आहेत. यावर टीकास्त्र सोडताना ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रावर संकटे आली होती, तेव्हा मोदी-शहा फिरकलेही नाहीत. आता दोन महिनेच त्यांचे सरकार आहे. महाराष्ट्र खूप सुंदर आहे. त्यांना फिरू द्या. महाराष्ट्राची जनता काय सांगतेय, हेही त्यांनी समजून घेतले पाहिजे. लोकसभेत महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याच्या भाजपच्या दाव्याची चेष्टा करत महाराष्ट्रात आम्ही सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकू, असा टोला त्यांनी मारला. तसेच भाजप संपूर्ण देशात ४५ जागा जिंकणार असल्याची टर उडवली.

‘शिवसेनेची मशाल... एकनिष्ठ सेनेची मशाल

‘ही मशाल एक चिन्ह म्हणून नाही तर सरकार विरोधात जो जनतेत असंतोष आहे, तो या मशालीच्या रूपाने भडकणार आहे. मशालीच्या आगीत ही जुमलेबाजी आणि हुकूमशाही राजवट जळून भस्म होईल,’’ असा आत्मविश्वास शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ‘शिवसेनेची मशाल... एकनिष्ठ सेनेची मशाल... ’हे नवे गीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आले त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सांगलीतील बंडखोरी थांबवण्याची जबाबदारी काँग्रेस नेतृत्वाची आहे. बंडखोरी कुठे झाली तर जनता आता कोणाला स्थान देणार नाही.

- उद्धव ठाकरे, पक्षनेते, शिवसेना ((उद्धव बाळासाहेब ठाकरे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kyrgyzstan Violence : किर्गिस्थान हिंसाचार! संभाजीनगर, धाराशिव, बीडचे ५०० विद्यार्थी अडकले; होणार ऑनलाईन परीक्षा

Bad Smell of Cooler: कुलरमधून येणारी दुर्गंधी झटक्यात होईल दूर, फक्त करा 'हे' घरगुती उपाय

Latest Marathi News Live Update: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे अपडेट

Career Options : आज 12th चा निकाल लागणार पण करियर ऑप्शन्स ठरलेत का? इथे वाचा लिस्ट, फायद्यात राहाल

KKR vs SRH: फायनलच्या तिकीटासाठी कोलकाता-हैदराबाद आमने-सामने! आत्तापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड

SCROLL FOR NEXT