

IPL 2024, KKR vs SRH Head to Head: इंडियन प्रीमीयर लीग २०२४ (IPL) स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने संपले आहेत. त्यामुळे आता प्लेऑफचा थरार सुरू होणार आहे.
प्लेऑफमधील क्वालिफायर वनचा सामना मंगळवारी (२१ मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिमयमवर हा सामना रंगणार आहे.
कोलकाताने 14 सामन्यांपैकी 9 सामने जिंकले, तर तीन पराभव स्विकारले आहेत. तसेच 2 सामने अनिर्णित राहिल्याने त्यांनी 20 गुणांसह अव्वल क्रमांक काबीज केला. तसेच हैदराबादने 14 सामन्यांतील 8 विजय, 5 पराभव आणि आणि 1 अनिर्णत सामन्यासह 17 पाँइंट्ससह दुसरा क्रमांक मिळवला आहे.
त्यामुळे हे दोन संघ पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर असल्याने त्यांच्यात क्वालिफायर वनचा सामना होत आहे. आता या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. तर पराभूत संघाला क्वालिफायर टूचा सामना खेळावा लागेल.
सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स आत्तापर्यंत 26 वेळा आमने-सामने आले आहेत. या 26 सामन्यांपैकी 9 सामने हैदराबादने जिंकले आहेत, तर तब्बल 17 सामने कोलकातने जिंकले आहेत.
त्याचबरोबर गेल्या पाच सामन्यातील आकडेवारीबद्दल सांगायचे झाल्यास तीन सामन कोलकाताने जिंकले आहे, तर 2 सामने सनरायझर्स हैदराबादने जिंकले आहेत. आयपीएल 2024 मध्ये या दोन संघात एकचा सामना झाला असून हा सामना कोलकाताने अवघ्या 4 धावांनी जिंकला होता.
दरम्यान, क्वालिफायर वनच्या सामन्याला रात्री 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. तसेच त्याआधी 7 वाजता नाणेफेक होणार आहे. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह प्रसारीत करण्यात येणार आहे. तसेत जिओ सिनेमा ऍप व वेबसाईटवरही हा सामना लाईव्ह पाहाता येणार आहे.
सनरायझर्स हैदराबाद - ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अब्दुल सामद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर , जयदेव उनाडकट, मयंक अगरवाल, एडन मार्करम, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, जटावेध सुब्रमण्यन, फजलहक फारुकी, मार्को यान्सिन, आकाश महाराज सिंग
कोलकाता नाईट रायडर्स - रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, मनीष पांडे, नितीश राणा, श्रीकर भारत , शेरफान रदरफोर्ड, दुष्मंथा चमीरा, अंगक्रिश रघुवंशी, साकिब हुसैन, सुयश शर्मा, अल्लाह गझनफर, चेतन साकरीया
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.