Eknath Shinde  group Uddhav Thackeray news
Eknath Shinde group Uddhav Thackeray news esakal
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचाही पोहरादेवी दौरा निश्चित; नेमकी राजकीय खेळी काय?

संतोष कानडे

मुंबईः उद्धव ठाकरे हेदेखील पोहरादेवीला जाणार आहेत. रामनवमीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंचा दौरा निश्चित झाल्याची माहिती आहे.

बंजारा समाजाच्या पोहरावेदी देवस्थान येथे आज महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी संजय राठोड नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळेच आता पोहरादेवी संस्थानसाठी ५९३ कोटी रुपये विकासनिधी दिला आहे.

या मेळाव्यानंतर ठाकरे गटाच्या गोटातून एक बातमी येत आहे. येत्या ३० मार्च रोजी उद्धव ठाकरे रामनवमीच्या निमित्ताने पोहरादेवीला जाणार आहेत. सुनील महाराज यांनी ही माहिती दिली आहे. 'एपीबी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

संजय राठोड यांनी आयोजित केलेल्या आजच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने बंजारा बांधवांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी यावेळी बंजारा समाजासाठी अनेक घोषणा केल्या. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचा दौरा निश्चित झाला आहे.

बंजारा समाजाचं पाठबळ आपल्या मागे राहावं, यासाठी ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गट यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला विशेष अर्थ आहे. तिथे गेल्यानंतर ते काय बोलतात? यावर पुढची गणितं अवलंबून असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT