Udhav Thakare.jpg
Udhav Thakare.jpg Sakal
महाराष्ट्र

सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Meeting) आज पार पडलेल्या बैठकीत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२१ पर्यंतचे राजकीय गुन्हे (Political FIR) मागे घेण्यात येणार आहे. सरकार बदलल्यास होणारी अडचण टाळण्याची तजबीज या निर्णयातून करण्यात आल्याचे दिसून येत आहेत. आज पार पडलेल्या बैठकीला काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे (NCP) सर्व मंत्री उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे केवळ तीनच मंत्री या बैठकीला उपस्थित होते. (Maharashtra Cabinet Meeeting News)

विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर शिवसेना नेते एकथाथ शिंदे (Eknath Shinde) काही आमदारांसह पहिले सुरत आणि त्यानंतर गुवाहटीत दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होऊन सत्ता पालट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आज राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत 2021 पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सरकार बदलल्यास होणारी अडचण टाळण्यासाठी हा निर्णय घेऊन तजवीज करण्यात आल्याचे या निर्णयानंतर समोर आले आहे. सध्याचे सरकार राहिल की जाईल याची कोणतीच शाश्वती नसल्याने अशा प्रकारचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेनेचे काही मंत्री हे नाराज एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहटी येथे आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीला शिवसेनेचे कोणकोणते मंत्री बैठकीला उपस्थित राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित रहिले होते. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या बैठकीला हजर नव्हते.

मला उमेदवारी दिली असती तर हे झालं नसतं - संभाजीराजे

राज्यातल्या राजकीय गदारोळावर संभाजीराजे छत्रपती यांनीही भाष्य केलं आहे. पुण्यात पालखी सोहळ्यासाठी आलेले असताना संभाजीराजे बोलत होते. मला उमेदवारी दिली असती तर हे घडलं नसतं, अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली आहे. एकनाथ शिंदेंची खदखद आजची नाही, अनेक वर्षांची आहे, असंही संभाजीराजे म्हणाले आहेत. सरकार कुणाचेही असावे पण ते चांगलं चालावं आमचं एवढंच मत आहे, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT