Ujjani Dam saka
महाराष्ट्र बातम्या

उजनी धरण 50 टक्के भरले! धरणात दौंडवरून 30 हजार क्युसेकचा विसर्ग; दोन महिन्यांत उजनी धरणात 60 टीएमसी पाणी; यंदा अडीच कोटी युनिट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट

उजनी धरणातील पाणीसाठा आता ५० टक्क्यांवर पोचला आहे. अद्याप खडकवासला, चासकमान या दोन धरणांतून सोडलेला जवळपास ३० हजार क्युसेकचा विसर्ग उजनीत येत आहे. त्या विसर्गामुळे धरण ६० टक्क्यांपर्यंत जाईल, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणातील पाणीसाठा आता ५० टक्क्यांवर पोचला आहे. अद्याप खडकवासला, चासकमान या दोन धरणांतून सोडलेला जवळपास ३० हजार क्युसेकचा विसर्ग उजनीत येत आहे. त्या विसर्गामुळे धरण ६० टक्क्यांपर्यंत जाईल, असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत उजनी धरण यंदा काही दिवस अगोदरच ५० टक्क्यांवर पोचले आहे. उन्हाळ्यात तळ गाठलेल्या उजनी धरणात १ जूनपासून तब्बल ६० टीएमसी पाणी जमा झाले आहे. पावसाळा सुरू होऊन आता दोन महिने झाले असून आणखी दोन महिने पावसाळा आहे. त्यामुळे गतवर्षी ६६ टक्क्यांवर थांबलेले धरण यंदा ओव्हरफ्लो होईल हे निश्चित.

उजनी धरणावर सोलापूर शहर, धाराशिव, कर्जत-जामखेडसह अनेक एमआयडीसींना, साखर कारखान्यांना व गावांना उजनीचाच आधार आहे. याशिवाय जिल्ह्यातील दीड ते पावणेदोन लाख हेक्टरला थेट उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले असून त्यातून सर्वाधिक ४० हून अधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात सुरू झाले आहेत. त्यातून हजारो हातांना काम मिळाले आहे. पुढील उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही उपसा सिंचन योजना पूर्ण होणार असल्याने धरणातील पाणी त्या जमिनींना देखील मिळणार आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पातळीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते.

अडीच कोटी युनिट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट

यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस होईल आणि उजनी धरण ओव्हरफ्लो झाल्यावर खाली भीमा नदीतून पाणी सोडून दिले जाते. त्यावेळी धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्पातून वीजेची निर्मिती केली जाते. गतवर्षी धरण ६६ टक्केच भरल्याने वीजनिर्मिती होवू शकली नाही. यंदा अडीच लाख युनिट (अडीच मिलियन युनिट) वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. पुणे जिल्ह्यातून दौंड, बंडगार्डनवरून येणारा विसर्ग, शिल्लक पावसाचे दिवस (हवामान खात्याच अंदाज) व धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याच अंदाज घेवून धरणातून नदीतून पाणी सोडले जाणार आहे. त्यावेळी वीजनिर्मितीची प्रक्रिया सुरू होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

उजनी धरणाची सद्य:स्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • ९० टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • ५०.०५ टक्के

  • उपयुक्त पाणीसाठा

  • २५.४९ टीएमसी

  • धरणात येणारा विसर्ग

  • ३० हजार क्युसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nashik Railway: रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! उरळीवरून जाणार पुणे-नाशिक लोहमार्ग; ताशी १६० किलोमीटर वेग, नेमका कसा असेल मार्ग..

Goras Bhandar FDA Action : वर्धेतील 'गोरस भंडार'वर कारवाई का केली? उच्च न्यायालयाची राज्य शासनाला विचारणा

Operation tiger : ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेशाचा १९ जूनचा मुहूर्त ‘तांत्रिक’, ‘भावनिक’ बाबींमुळे टळणार? एकनाथ शिंदेंची सावध खेळी

मोठी बातमी! सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकीचे प्रवेश पुढच्या वर्षीच; ‘AICTE’ची मान्यता नाही; आता वर्षभरात पदभरती, इमारतीची डागडुजी, संचालक म्हणाले...

आजचे राशिभविष्य - 18 जून 2026

SCROLL FOR NEXT