Devendra Fadnavis
Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

कोपर्डी निकालाने पीडितेला न्याय: फडणवीस

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा झाल्याने पीडितेला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून झाला होता. या खटल्यातील दोषी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.

या निकालावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, की उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकीलांनी न्यायालयात बाजू मांडली, मी त्यांचे अभिनंदन करतो. विक्रमी वेळेत खटल्याचे काम पूर्ण केले. आरोपींच्या वकीलांनी अनेकवेळा खटला पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केले. पण, त्यांना यश आले नाही. आरोपींनी फाशी होण्याची महाराष्ट्रातील महिलांची मागणी होती, आज न्यायालयाने तोच निकाल दिला आहे. हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढविणारा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT