Underworld don Arun Gawli brother joins Shinde group maharashtra politics
Underworld don Arun Gawli brother joins Shinde group maharashtra politics  
महाराष्ट्र

CM शिंदेंची ताकद वाढली; अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा शिंदे गटात प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. अशातच अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावानेही शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांमुळे राजकीय वर्तुळात मुख्यमंत्र्यांची ताकद वाढली अशी चर्चा सुरू आहे.

मुंबईच्या भायखळ्यातील दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणाजे, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा भाऊ . प्रदिप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी वर्षा निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षप्रवेशाचे काही फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

शिंदे काय म्हणाले?

लोकांना हवी असलेली या भागातले प्रश्न असतील त्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचं काम तुमच्या मार्गदर्शनाखाली तिथे केले जाईल. हा विश्वास आपल्याला मी देऊ इच्छितो. गेल्या सहा-सात महिन्यामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा सरकार आपण स्थापन केल्यानंतर या राज्यातल्या अगदी जिल्हा जिल्ह्यातून तालुका तालुक्यातून शहरातून अनेक लोक अनेक कार्यकर्ते विविध पक्षातले पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होत आहे.

एवढेच नाही तर राज्याच्या बाहेरचे देशभरातले देखील आपले कार्यकर्ते पदाधिकारी राज्य प्रमुख हे देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT