महाराष्ट्र

स्मारकासाठी भूखंड न मिळणे हे दुर्दैव - राज

सकाळवृत्तसेवा

मुंबई - ‘‘शहरातील विकसकांना भूखंड वाटले जातात; पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी भूखंड मिळत नाही, हे दुर्दैव आहे. महापौरांचा बंगला बाळासाहेबांच्या स्मारकाच्या नावाने कुणाच्या तरी हितासाठी गिळला जातो,’’ अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेना आणि राज्य सरकारवर तोफ डागली.

शिवाजी पार्क येथील जिमखान्याची जागा टेनिस आणि बॅडमिंटन कोर्टसाठी राखीव आहे. तेथे अनेक वर्षांपासून हे खेळ खेळले जातात. तेथे प्रस्तावित महापौर निवासस्थान होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ठाकरे म्हणाले, मुंबईसारख्या शहरातील महापौर निवासस्थानासाठी वणवण भटकत आहे. ही महापौरपदाची थट्टा आहे. राज्यात बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कुठेही जागा उपलब्ध होऊ शकेल. महापौर निवासासारख्या वास्तूंवर अधिकार सांगत सत्ताधारी चुकीचा पायंडा पाडत आहेत. महापौरांसाठी बंगला असावा, यासाठी बाळासाहेबांनी संघर्ष केला होता. त्या बंगल्यातूनच महापौरांना बाहेर काढले जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT