Shivsena BJP
Shivsena BJP 
महाराष्ट्र

Vidhansabha 2019 : शिवसेना एक पाऊल मागे घेणे शक्य

सकाळ न्यूज नेटवर्क

१४५ - १२५ - १८ जागांचा फॉर्म्युला; भाजपच्या सहमतीची शक्यता
मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जागावाटपात सिंहाचा वाटा मागणाऱ्या शिवसेनेने एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी १४५ - १२५ - १८ जागांच्या फॉर्म्युलावर शिक्‍कामोर्तब होण्याची दाट शक्‍यता आहे. पितृपक्षानंतर दोन दिवस ठप्प असलेली चर्चा आज मध्यस्थांमार्फत पुन्हा सुरू झाल्यानंतर शिवसेनेकडून हा प्रस्ताव भाजपला पाठविण्यात आला असून, भाजपही यावर सहमत होण्याची शक्‍यता आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या चर्चेत विधानसभा निवडणुकीतही युती होणार आणि समान जागावाटप होणार असे सूत्र ठरल्याचे दोन्ही पक्षांकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, भाजपने आता माघार घेत जागावाटप करताना शिवसेनेची अडवणूक करण्यास सुरवात केली होती. शिवसेनाही १३५ - १३५ च्या फॉर्म्युलावर अडून बसली होती. अखेरीस आज झालेल्या चर्चेनंतर भाजप १४२ ते १४५  जागा, शिवसेना १२८ ते १२५ जागांवर निवडणूक लढविण्यास तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मित्रपक्षांना मात्र १८ जागा देण्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झालेले असून, त्या जागा मात्र कमी- जास्त झालेल्या नसल्याचे समजते.    

विधानसभा निवडणुकीसाठी युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून भाजपकडे अपेक्षेपेक्षा अधिक जणांची भरती झाल्याने भाजपवर इच्छुकांना उमेदवारी देण्याची जबाबदारी वाढली, त्यामुळेच पितृपक्षाच्या पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये भाजपकडून काँग्रेसमधून आलेल्या अमुकसाठी ही जागा, तर राष्ट्रवादीमधून आलेल्यासाठी ती जागा अशी जागा मागण्यास सुरवात झाली होती. उमेदवारनिहाय जागांचे वाटप होऊ लागल्याने उद्धव ठाकरे त्रस्त झाल्याने जागावाटपाची चर्चा थांबली होती.

त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी प्रसिद्धी माध्यमांना मुख्यमंत्रीच शिवसेनेच्या उमदेवारांची यादी जाहीर करतील असा टोला मारला होता. उद्धव ठाकरेंनी उघडपणे नाराजी व्यक्‍त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही चर्चा पुढे जावी यासाठी प्रयत्न केल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : रसिखच्या एकाच षटकात दोन विकेट्स; हार्दिकचं अर्धशतकही हुकलं, मुंबईचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

DC vs MI, IPL : दिल्लीकडून आजपर्यंत कोणालाच जमला नव्हता, तो विक्रम फ्रेझर-मॅकगर्कने एकदा नाही तर दोनदा करून दाखवला

SCROLL FOR NEXT