Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

''डीएमकेवाले लोक सनातनला डेंग्यू, मलेरिया म्हणत आहेत.. सनातनच्या विनाशाच्या गोष्टी करत आहेत. त्याच लोकांना इंडी आघाडीचे लोक महाराष्ट्रात बोलावून त्यांचा सन्मान करत आहेत. हे बघून स्व. बाळासाहेब ठाकरेंना किती वाईट वाटत असेल.''
PM Narendra Modi Wardha
PM Narendra Modi Wardhaesakal

कोल्हापूरः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी कोल्हापुरात सभा झाली. या सभेतही मोदींनी काँग्रेस, राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला धारेवर धरलं. सनातन धर्माचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली आणि उद्धव ठाकरेंच्या गटाला टोला लगावला. पंतप्रधानांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली होती.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ५०० वर्षांनंतर या देशाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. अयोध्येत राम मंदिर उभारलं. मंदिराचे ट्रस्टी चांगले होते म्हणून त्यांनी काँग्रेसची पापं विसरुन त्यांना निमंत्रण दिलं. परंतु काँग्रेसच्या लोकांनी ते निमंत्रण डावललं. अशा लोकांना जनता निवडून देईल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

PM Narendra Modi Wardha
Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

मोदी पुढे म्हणाले, डीएमकेवाले लोक सनातनला डेंग्यू, मलेरिया म्हणत आहेत.. सनातनच्या विनाशाच्या गोष्टी करत आहेत. त्याच लोकांना इंडी आघाडीचे लोक महाराष्ट्रात बोलावून त्यांचा सन्मान करत आहेत. हे बघून स्व. बाळासाहेब ठाकरेंना किती वाईट वाटत असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धरतीवर हे लोक औरंगजेबाला मानणाऱ्यांना जावून मिळाले आहेत. नकली शिवसेना सध्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना यातना झाल्या असत्या. त्यांच्या आत्म्याला नक्कीच दुःख झालं असेल, असं म्हणत मोदींनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

पंतप्रधानांच्या भाषणातील मुद्दे...

  • मी कशीचा खासदार आहे, मात्र मी आज करवीर काशीमध्ये आलेलो आहे

  • कोल्हापूरला फुटबॉल हब म्हटलं जातं, भाजप आणि एनडीए सध्या २.० ने आघाडीवर आहे

  • काँग्रेस आणि एनडी अलायन्सने देशविरोधी आणि द्वेषाच्या राजकारणाचे दोन सेल्फ गोल केले आहेत

  • त्यामुळे फिर एक बार मोदी सरकार येणार असल्याचं देशातील लोकांनी ठरवलं आहे

  • इंडी अलायन्सने देशविरोधी अजेंडा सुरु केला आहे

  • काँग्रेसचा अजेंडा आहे की, ते सरकारमध्ये आल्यानंतर काश्मीरमध्ये आर्टिकल ३७० वापस आणतील

  • परंतु आता कुणामध्ये हिंमत आहे का की मोदींचा हा निर्णय बदलू शकतील

  • यांचं सरकार बनलं तर ते सीएए रद्द करतील, असं सांगत आहेत

  • ज्यांना सध्या तीन अंकी जागा जिंकणं मुश्कील आहे ते सरकारच्या दारात तरी पोहोचतील का? हाच खरा प्रश्न आहे

पाच वर्षात पाच पंतप्रधान

इंडिया आघाडीने पाच वर्षांमध्ये पाच पंतप्रधान करण्याचा प्लॅन केल्याचं पंतप्रधान म्हणाले. काँग्रेसचं सरकार आलं तर प्रत्येक वर्षी देशाला नवीन पंतप्रधान मिळेल. त्यांनी कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगडमध्ये अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला करुन दाखवला होता, असा घणाघात पंतप्रधानांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com