Voting  Sakal
महाराष्ट्र बातम्या

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान होणार आहे. २०१७ च्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी २१ लाख ३१ हजार ८३० मतदार होते. त्यातील १४ लाख २७ हजार ४४२ मतदारांनी (६६.९६ टक्के) मतदान केले होते. यंदाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात मागील निवडणुकीच्या तुलनेत तीन लाख २७ हजार मतदार वाढले आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान होणार आहे. २०१७ च्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी २१ लाख ३१ हजार ८३० मतदार होते. त्यातील १४ लाख २७ हजार ४४२ मतदारांनी (६६.९६ टक्के) मतदान केले होते. यंदाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात मागील निवडणुकीच्या तुलनेत तीन लाख २७ हजार मतदार वाढले आहेत. त्यात एक लाख ३९ हजार ८२९ पुरुष आणि एक लाख ८७ हजार ५०४ महिला मतदार वाढल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत अक्कलकोट तालुक्यात सर्वांत कमी ५८.७३ टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक मतदान पंढरपूर तालुक्यात ७१.७६ टक्के मतदान झाले होते. बाकीच्या सर्वच तालुक्यांमध्ये ६० ते ६९ टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीवेळी जिल्ह्यात १९ इतर मतदार होते, पण एकानेही मतदानाचा हक्क बजावला नव्हता. आता इतर मतदारांची संख्या ८३ असून, त्यांनाही मतदान करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यंदा ७ फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान पार पडणार आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदारांना मतदान करता यावे, यासाठी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. खासगी व्यवसाय, उद्योगांमधील मतदारांना देखील दोन तासांची सवलत देण्यात आली आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी जिल्ह्यात साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय मतदानासाठी १३ हजारांवर कर्मचारी नेमले आहेत. त्यांना उद्या (शुक्रवारी) ‘लालपरी’तून मतदान साहित्यांसह नेमून दिलेल्या केंद्रांवर पोच केले जाणार आहे.

लाडक्या बहिणींचे मतदान निर्णायक

सोलापूर जिल्ह्यात २०१७ च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत पावणेदोन लाखांहून अधिक महिला मतदार वाढल्या आहेत. या निवडणुकीसाठी ११ लाख ८२ हजार ८३ महिला मतदार आहेत. मागील निवडणुकीत नऊ लाख ९४ हजार ५७९ पैकी सहा लाख ५२ हजार ६३२ महिलांनी मतदान केले होते. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील महिलांचे मतदान किमान दहा लाखांपर्यंत होण्याचा अंदाज आहे. ‘लाडकी बहीण’च या निवडणुकीत निर्णायक ठरेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

  • सोलापूर जिल्ह्यातील स्थिती...

  • जिल्हा परिषदेचे गट

  • ६८

  • एकूण उमेदवार

  • २७१

  • पंचायत समित्यांचे गण

  • १३६

  • एकूण उमेदवार

  • ४८५

  • जिल्ह्यातील एकूण मतदार

  • २४,५९,२२७

  • एकूण मतदान केंद्रे

  • २,७५८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: सायलीच तन्वी असल्याचं उघड होणार ? नव्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्साह; "आता मालिका योग्य ट्रॅकवर"

Pune Hospital Bomb Scare : पुणे-हडपसर बॉम्बसदृश प्रकरण : संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, 'आरोग्य विभागा'शी काय आहे कनेक्शन?

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

ChatGPT ने एका रात्रीत बनवून टाकलं करोडपती! केली 631 अब्ज रुपयांची कमाई, काय होती ट्रिक? पाहा

IPL 2026: विकेट तर गेलीच, पण सोन्याची चैनही पडली! RCB च्या ओपनरसोबत घडला अजब प्रकार अन् मग पडिक्कलने दाखवलं वेळेचं भान

SCROLL FOR NEXT