Petrol Diesel
Petrol Diesel sakal
महाराष्ट्र

राज्याच्या इंधनावरील व्हॅटकपातीची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

राज्य सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही.

पुणे - राज्य सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. त्यामुळे वाहनचालकांना इंधन दरकपातीची अद्यापही प्रतीक्षाच आहे.

‘व्हॅट’मध्ये कपात केल्यास पेट्रोल आणखी दोन रुपये आठ पैसे आणि डिझेल १ रुपया ४४ पैशांनी प्रतिलिटर स्वस्त होईल. मात्र, वाढत्या इंधन दरवाढीच्या तुलनेत ही कपात अत्यल्प आहे. त्यामुळे महागाई कमी होण्यासाठी या कपातीचा फारसा उपयोग होणार नाही, अशीही प्रतिक्रिया तज्ज्ञांची व्यक्त केली आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर शंभरच्या पुढे गेल्याने महागाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे इंधनाच्या दरात कपात करण्याची मागणी जोर धरु लागली. इंधनाचे दर कमी होण्यासाठी विविध पक्षांकडून आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इंधन दरात कपात केली आहे. त्यानंतर राज्य सरकारने ‘व्हॅट’मध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी अद्याप झाली नाही.

शहरातील गुरुवारचे दर...

  • पेट्रोल - १११.९३ रु/लिटर

  • डिझेल - ९६.३८ रु/लिटर

केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारने निर्णय घेण्याची गरज आहे, तरच नागरिकांना महागाईतून दिलासा मिळणार आहे. केवळ घोषणा करून काहीही होणार नाही. प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. करामध्ये आणखी कपात केल्यास पेट्रोलचे दर हे ९० रुपयांच्या घरात येऊ शकतात.

- अली दारूवाला, प्रवक्ता, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन

इंधनावरील करांचा भार कमी केल्याने दर कमी होतील. मात्र, महागाईवर त्याचा फार तर अर्धा ते पाऊण टक्का परिणाम होऊ शकतो. वाहतुकीच्या इंधन खर्चात बचत होऊ शकते. वाढलेल्या वस्तूंच्या किमती किती कमी होऊ शकतील, हे आताच सांगता येणार नाही.

- अभय टिळक, अर्थतज्ज्ञ

पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने महागाई वाढत चालली आहे. दर कपात केल्याने महागाई काहीशी नियंत्रणात येऊ शकेल. मात्र, वस्तूंच्या वाढलेल्या किमती लगेच कमी होत नसतात. पेट्रोल, डिझेलचे दर शंभरच्या आत आल्यास खऱ्या अर्थाने महागाई कमी होईल.

- राहुल बोरा, व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT