kirit somaiya Udhhav Thackeray
kirit somaiya Udhhav Thackeray esakal
महाराष्ट्र

मुख्यमंत्री, त्यांचे नातेवाईक आणि इतर कोणालाही सोडणार नाही - सोमय्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patanakar) यांच्यावर ईडीनं (ED) कारवाई केली आहे. त्यांच्या पुष्पक बुलियन ग्रुपच्या (Pushpak Bulian Group) इमारतीतील ११ फ्लॅट जप्त केले आहेत. ही एकूण मालमत्ता ६ कोटींहून अधिक किंमतीची आहे. या कारवाईनंतर भाजप नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांसह त्यांचे नातेवाईक आणि इतर कोणालाही सोडणार नाही, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. (We will not leave Chief Minister his relatives and anyone else says Kirit Somaiya)

सोमय्या म्हणाले, एकाही घोटाळेबाजांना आता सोडणार नाही. मग उद्धव ठाकरे असोत किंवा त्यांचा मेहुणा असो किंवा त्यांचा डावा-उजवा हात असो. या घोटाळेबाजांविरोधात मी दीड वर्षांपासून लढतोय आता अॅक्शन सुरु झाली आहे. पुढे अजून बघाच तुम्ही. सगळ्यांनी ज्या प्रकारे माफियागिरी चालवली आहे. हा लूटीचा माल आता जनतेच्या तिजोरीत जमा करणार आहे.

याचा शंभर टक्के संबंध उद्धव ठाकरेंशी असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. दोन डझन शेल कंपन्यांमधून हे पैसे ट्रान्सफर केले आहेत. हा सगळा महापालिका कॉन्ट्रॅक्टर आणि राज्य सरकारच्या घोटाळेबाजारांकडून आलेला पैसा आहे, असा आरोप करताना हा सगळा हिशोब जनतेसमोर ठेवणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या काळात लुटलेले पैसै वळवले का? - राम कदम

आर्थिक व्यवहारांचा हिशोब देता येणार नसेल तर त्याची चौकशी व्हायला हवी. पण जेव्हा राज्याच्या प्रमुखपदी बसलेल्या व्यक्तीचे जर अशा व्यक्तीशी जवळचे संबंध असतील तर ते अतिशय गंभीर आहे. मागच्या अडीच वर्षाच्या काळात आपण पाहिलं आहे. की जेव्हा लोकांचं एका ठिकाणी तडफडून मृत्यू होत होता. तेव्हा महाराष्ट्रातील तीन पक्षाचं सरकार एका टेबल फॅनचं भाडं, रुग्णालयांची उपकरणं, हॉस्पिटल बनवण्याची कंत्राटं ज्यांना याची माहिती नाही त्यांना दिली जात होती. त्यामुळं यांनी लोकांचे लुटलेले पैसे लपून राहिलेले नाहीत. हे लुटलेले पैसे अशाच प्रकारे वळवले जात होते का? असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी विचारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singapore Airlines: लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद; निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक प्रथमच 52,000च्या वर, कोणते शेअर्स चमकले?

Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहचा पाय खोलात! कोर्टानं ७ विविध कलमांतर्गत केली आरोप निश्चिती

Blackout Teaser Out: "वक्त बदलने वाला है!"; '12 वी फेल' फेम विक्रांतच्या 'ब्लॅकआऊट'चा जबरदस्त टीझर रिलीज

HSC Result : पत्रकार व्हायचंय? 12वी नंतर काय कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT