What are the rules for private transport rickshaws ST railway planes interstate travel 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात निर्बंध असताना, प्रवास करायचा आहे? काय आहेत नियम?

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यात कोरोना रुग्णवाढ चिंताजनक वेगाने होत असल्याने कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत पुढील १५ दिवस राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. राज्यात लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लादले असून आज (बुधवारी) रात्री आठ वाजल्यापासून ते एक मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संचारबंदी असणार आहे. या काळात अत्यावश्यक कारणाशिवाय लोकांना घराबाहेर पडता येणार नाहीत.

राज्यात लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधानुसार, राज्यात अत्यावश्यक सेवा आणि वैध काराणांसाठी सार्वजनिक वाहतूक आणि खासगी वाहतूक सुरू असून नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे. म्हणजेच अत्यावश्यक सेवीतील कर्मचाऱ्यांना आणि वैध कारणासाठी राज्यांतर्गत प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. रिक्षा, एसटी बस,  टॅक्सी, रेल्वे, विमान सेवा राज्यात सुरू असून नियामांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

राज्यात लग्न समारंभासाठी नियमात बदल; इतर कार्यक्रमांसाठी कसे आहेत निर्बंध?

सार्वजनिक वाहतूकीसाठीचे नियम
रिक्षा : चालक+२ प्रवासी
टॅक्सी (चार चाकी) : चालक+आरटीओ नियमानुसार ५० टक्के आसनक्षमता
बस : आरटीओनुसार पूर्ण आसनक्षमता, स्टँडींगला परवानगी नाही
- सर्व प्रवाशांनी मास्क योग्य पद्धतीने लावणे अनिवार्य, अन्यथा पाचशे रुपये दंड
- टॅक्सीत प्रवाशाने मास्क घातला नसल्यास त्याच्यासह चालकाला प्रत्येकी पाचशे रुपये दंड
- प्रत्येक फेरीनंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे
- नियमांचे पालन न करणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांतील प्रवाशांना प्रत्येकी ५०० रुपये दंड
- बस, रेल्वे, विमानाने येणाऱ्या प्रवाशांना वैध तिकिटाच्या अटीवर पुढील प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या वापराची परवानगी

खासगी वाहतूकीचे नियम
- आणीबाणी, अत्यावश्यक सेवा किंवा वैध कारणांसाठी खासगी वाहनांना परवानगी
- नियम मोडल्यास एक हजार रुपये दंड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana Revanth Reddy Cabinet: तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारचा मोठा निर्णय! भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधारास केलं मंत्री

IND vs AUS 2nd T20I Live: 4,6,4,0,6,W! मिचेल मार्शकडून कुलदीपचे खतरनाक स्वागत; तिलक वर्माच्या अफलातून झेलने ऑसी गार Video Viral

Latest Marathi News Live Update : मंत्री गोगावले यांचा राज ठाकरे यांना पलटवार; “उद्धव ठाकरेंसोबत जाणं ही सत्तेसाठीची लाचारी नाही का?”

Bank Holiday : नोव्हेंबरमध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद , जाणून घ्या संपूर्ण सुट्ट्यांची यादी

रोज पोटावर मांडीवर इंजेक्शन, अभिनेत्रीने बाळ होण्यासाठी 'अशी' घेतली ट्रीटमेंट, म्हणाली...'मला बेशुद्ध होण्यासाठी...'

SCROLL FOR NEXT