cash
cash sakal
महाराष्ट्र

निवडणुकीतील डिपॉझिट म्हणजे काय? उमेदवारांना डिपॉझिट वाचविण्यासाठी ‘एवढी’ मते घ्यावीच लागणार; सोलापूर- माढा मतदारसंघासाठी आतापर्यंत २२ जणांचे अर्ज

तात्या लांडगे

सोलापूर : लोकशाहीच्या निवडणूक महापर्वात अनेकजण निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांचा सामना करतात. मात्र, या सामन्यात उतरताना सुरवातीला निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारास अनामत (डिपॉझिट) रक्कम भरावी लागते. निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी (जात प्रवर्गनिहाय) अनामत रक्कम किती असावी, हे निश्चित केलेले असते. जर उमेदवाराने निवडणुकीदरम्यान आयोगाच्या अटी पूर्ण केल्या नाहीत, तर अनामत रक्कम जप्त केली जाते.

भारतीय संविधानाच्या कलम ८४ (ब) नुसार २५ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला लोकसभेची निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मात्र, त्या व्यक्तीची देशाच्या कोणत्याही भागात मतदार म्हणून नोंद असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात मतदार म्हणून नोंद असलेला मतदार केरळसह अन्य कोणत्याही राज्यात निवडणूक लढू शकतो. तसेच देशातील इतर कोणत्याही राज्यात मतदार म्हणून नोंद असलेला व्यक्ती देशाच्या कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढू शकतो.

भारतीय लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८ (३) ने दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झालेल्या कोणत्याही व्यक्तीला निवडणूक लढण्यास बंदी आहे. जर अशा व्‍यक्तीने निवडणुकीसाठी अर्ज केलाच, तर त्याचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरतो. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दोषी ठरवण्यात आलेल्या अशा व्यक्तीने आपल्या शिक्षेला आव्हान देणारी याचिका दाखल केली असेल आणि त्याचा निकाल प्रलंबित असेल, तरीही त्या व्यक्तीला निवडणूक लढविता येत नाही. निवडणुकीत एक व्यक्ती एकाच वेळी कोणत्याही दोन जागांवरून निवडणूक लढू शकतो.

डिपॉझिटची रक्कम किती आहे?

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल करताना २५ हजार रुपयांची अनामत (डिपॉझिट) रक्कम जमा करावी लागते. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातीमधील (एसटी) उमेदवाराला यातून काही सूट देण्यात आली आहे. एससी आणि एसटी उमेदवारांना १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम जमा करावी लागते. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी हीच रक्कम सामान्‍य उमेदवारासाठी १० हजार रुपये आणि एससी-एसटीसाठी पाच हजार रुपये आहे.

अशी जप्त होते अनामत रक्कम

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभारलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण वैध मतदानापैकी १६.६ टक्के मते घेण्यास अपयशी ठरला, तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते. १९५१-५२ च्या सर्वसाधारण निवडणुकीत एक हजार ८७४ उमेदवारांपैकी तब्बल ७४५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत ९१ टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. सोलापूर जिल्ह्यातील काही उमेदवारांना मागील निवडणुकीत आपली अनामत रक्कम गमवावी लागली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singapore Airlines: लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद; निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक प्रथमच 52,000च्या वर, कोणते शेअर्स चमकले?

Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहचा पाय खोलात! कोर्टानं ७ विविध कलमांतर्गत केली आरोप निश्चिती

Blackout Teaser Out: "वक्त बदलने वाला है!"; '12 वी फेल' फेम विक्रांतच्या 'ब्लॅकआऊट'चा जबरदस्त टीझर रिलीज

HSC Result : पत्रकार व्हायचंय? 12वी नंतर काय कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT