SC Final Decision Shiv Sena Controversy maharashtra politics shinde govt Dhananjay Chandrachud  Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Case : शिंदे ठाकरे खटल्यामध्ये सातत्याने उल्लेख होणारं घटनापीठ म्हणजे नक्की काय?

घटनापीठ आणि खंडपीठामध्ये काय फरक आहे, जाणून घ्या...

वैष्णवी कारंजकर

राज्यात चालू असलेल्या सत्तासंघर्षाची सुनावणी आज पूर्ण होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या प्रकरणाच्या माध्यमातून सातत्याने एक शब्द कानावर पडत आहे. तो म्हणजे घटनापीठ. याच घटनापीठाबद्दल जाणून घ्या.

घटनापीठ म्हणजे काय?

ज्या प्रकरणांमध्ये कायद्याचं मूलभूत स्पष्टीकरण द्यावे लागते, तेव्हा त्याची सुनावणी पाच किंवा त्याहून अधिक न्यायाधीशांच्या माध्यमातून केली जाते. न्यायाधीशांच्या या समूहालाच घटनापीठ म्हणतात. संविधानाच्या कलम १४५(३) मध्ये घटनापीठाची तरतूद करण्यात आली आहे.

एखाद्या खटल्यामध्ये जर घटनेच्या व्याख्येशी संबंधित कायद्यातल्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल, तर असे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा समावेश असलेल्या कमीत कमी ५ किंवा त्यापेक्षा जास्त न्यायाधीशाच्या घटनापीठापुढे पाठवलं जातं. सुनावणी सुरू असलेल्या प्रकरणासंदर्भात कायद्याचा अन्वयार्थ लावणं हे या घटनापीठाचं काम असतं.

स्थापना कशी होते?

जेव्हा एखाद्या खटल्यामध्ये दोन न्यायाधीशांचं एकमत होत नाही, तेव्हा मुख्य न्यायाधीश तिसऱ्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात. म्हणजे तेव्हा घटनापीठ तयार केलं जातं. यामध्ये न्यायमूर्तींची संख्या ३,५ किंवा ७ असते. या गटालाच घटनापीठ म्हणतात.

खंडपीठ म्हणजे काय?

राज्यांमध्ये उच्च न्यायालय हे मुख्य पीठ म्हणून काम करते. उच्च न्यायालय राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी असते, पण काही राज्यांमध्ये राजधानीव्यतिरिक्त ठिकाणीही उच्च न्यायालयाचे पीठ असते, त्याला खंडपीठ म्हणतात. उदा. - नागपूर, औरंगाबाग आणि गोव्यातल्या पणजी इथं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT