Dhannanjay-Munde
Dhannanjay-Munde 
महाराष्ट्र

भरपाई मिळालेला शेतकरी दाखवा - धनंजय मुंडे

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - दुष्काळावर चर्चा काय करायची, तुमच्या फसव्या घोषणा ऐकायला का? असा सवाल करत बोंडअळीची 34 हजार 700 रुपयांची नुकसान भरपाई मिळालेला एकतरी शेतकरी दाखवा, नाहीतर राजीनामा देईन, असे आव्हान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला दिले.

दरम्यान, मराठा आरक्षण लागू झाल्यास मोठे राजकीय श्रेय सत्ताधाऱ्यांना मिळेल, असे विरोधकांना वाटत असल्यामुळे ते सभागृहाच्या कामात व्यत्यय आणत आहेत, असा आरोप महसूलमंत्री आणि सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत केल्याने विरोधकांनी कामकाज रोखून धरले.

अधिवेशनाच्या कामकाजाच्या सलग पाचव्या दिवशी विरोधी पक्षाने विधान परिषदेचे कामकाज रोखून धरले. सरकारच्या विरोधातील घोषणांनी सभागृह दणाणून सोडल्याने सभागृह एकदा 35 मिनिटांसाठी, नंतर 15 मिनिटांसाठी आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. मराठा आरक्षणासंदर्भातला मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडण्यावरून झालेल्या प्रचंड गदारोळामुळे विधान परिषदेचे कामकाज आजही दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करेपर्यंत तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत सदनाचं कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका घेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. पीकविमा योजनेत सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत मुंडे यांनी या वेळी सरकारवर टीकेची झोड उठवली. या वेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला.

चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना उत्तर देताना आजपर्यंत आलेले मागासवर्ग आयोगाचे अहवाल सभागृहात मांडले गेलेले नाहीत, असे सांगत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. या वेळी विरोधक आणि सत्ताधारी सदस्यही हौद्यात उतरले. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT