Cancer
Cancer 
महाराष्ट्र

पुरुषांमध्ये वाढतोय स्तनाचा कर्करोग!

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महिलांमध्ये प्रामुख्याने आढळणारा स्तनाच्या कर्करोगाचा धोका आता पुरुषांमध्येही वाढू लागला आहे, असे निरीक्षण मुंबईतील कर्करोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे. १० वर्षांपूर्वी पाच वर्षांतून असा एखादाच रुग्ण आढळत असे; मात्र आता प्रत्येक दोन महिन्यांनी एक तरी पुरुष स्तनाच्या कर्करोगावर उपचार घेण्यासाठी येत आहे. पाच वर्षांत यात आणखी वाढ होण्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली.

भारतात पुरुषांना स्तनांचा कर्करोग होणे ही दुर्मिळ घटना होती; मात्र सध्या दर दोन महिन्याला एका पुरुषात स्तनाच्या कर्करोगाचे निदान होत असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती फोर्टिस रुग्णालयातील कर्करोग तज्ज्ञ डॉ. अनिल हेरूर यांनी सांगितले. 

१० वर्षांपूर्वी पुरुषांमधील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण अत्यल्प होते. पाच वर्षांतून एकदाच स्तनाचा कर्करोग झाल्याचा पुरुष उपचारासाठी यायचा. गेल्या दोन वर्षांत किमान सात पुरुषांवर मी स्तन कर्करोगाची शस्त्रक्रिया केली आहे, अशी माहिती सांताक्रूझ येथील नानावटी रुग्णालयाचे कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. संजय दुधट यांनी दिली. ही वाढती संख्या भविष्यातील धोक्‍याची घंटा आहे, अशी भीतीही डॉ. दुधट यांनी दिली.

कर्करोग नक्की कशामुळे होतो, हे ठामपणे सांगणे वैज्ञानिकदृष्ट्या अद्याप शक्‍य झालेले नाही; मात्र तंबाखू आणि इतर व्यसनांमुळे हा धोका वाढतो. तसेच, सध्या सर्व प्रकारच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता चुकीच्या जीवनशैलीमुळे हा आजार वाढत असल्याचा अंदाज डॉक्‍टर व्यक्त करत आहेत.

९० च्या दशकात ३३ रुग्ण 
टाटा रुग्णालयाच्या २००० मध्ये झालेल्या सर्वेक्षणात १९९० ते २००० पर्यंत केवळ ३३ पुरुषांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे दिसून आले होते. टाटा रुग्णालयात भारतीय उपखंडातील वेगवेगळ्या ठिकाणातून रुग्ण येतात. 

खर्च अवाक्‍याबाहेरच 
कर्करोगावरील उपचार अत्यंत खर्चिक आहेत. प्रत्यक्ष उपचार तसेच औषध आणि त्यासोबतची पथ्य यावर होणारा खर्च अधिक आहे. हा खर्च अनेकांना परवडणार नाही, असेही काही डॉक्‍टरांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT