YIN-Summer-Youth-Summit
YIN-Summer-Youth-Summit 
महाराष्ट्र

राज्यभरात २९ मेपासून ‘यिन समर यूथ समिट’

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांची अविरत स्पंदने... मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखविण्याचा उमेदीचा काळ... शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही.... या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने ‘यिन समर यूथ समिट’ आयोजित केली आहे. कोल्हापूर, नाशिक, नागपूर, नगर, पुणे, औरंगाबाद या सहा विभागांमध्ये २९ मेपासून २० जूनपर्यंत ही समिट होणार आहे. बारावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यात सहभाग नोंदविता येईल.

उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करून ऊर्जा देण्यासाठी व तरुणांनी स्वतःचा शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकास करताना देशाच्या जडणघडणीलाही हातभार लावावा, या हेतूने ‘समर यूथ समिट’चे आयोजन केले आहे.

तरुणांमधील सळसळत्या उत्साहाला दिशा देण्यासाठी ‘यिन’ राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहे. गेल्या चार वर्षांपासून ‘यिन’मार्फत ‘समिट’चे आयोजन केले जाते. यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येकाला समिटचे किट आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

सक्‍सेसफुल बिझनेस, टीम बिल्डिंग, युवा व राजकारण, सेलिब्रिटींशी संवाद, डिजिटल व ऑनलाइन मार्केटिंग आणि सायबर क्राइम, ऑनलाइन बॅंकिंग, स्टार्टअप ः द नेक्‍स्ट बिग थिंग, इमेज बिल्डिंग, आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद, क्रीडा व करिअरविषयी मार्गदर्शन, प्रेझेंटेशन स्किल्स अशा विविध विषयांवर विविध सत्रे होतील. यात देश-विदेशातील तज्ज्ञ मार्गदर्शक तरुणाईशी संवाद साधणार आहेत. यातून प्रत्येकाला नवी प्रेरणा आणि दिशा मिळणार आहे. चला तर मग, आजच नोंदणी करा..!

तरुणाईची व्याख्या म्हणजे जो विचाराने तरुण आहे, जो विश्वास ठेवून उद्याची स्वप्ने पाहतो तो तरुण. जाती, धर्म, भाषा अशा कित्येक भिंती तोडून सर्व तरुणांनी एकत्र यायला हवे. तसे झाले, तरच या भारतभूमीत जन्मलेल्या प्रत्येक महामानवासाठी ते खरे अभिवादन ठरेल.
- रोहित राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, बारामती ॲग्रो लिमिटेड, पुणे

आजचा युवक उद्याच्या सशक्त व समृद्ध भारताचा शिल्पकार आहे. युवकांना योग्य दिशा देणारे व मार्गदर्शन देणारे ‘यिन’ व्यासपीठ आहे. ‘यिन’च्या माध्यमातून युवकांच्या सक्षमीकरणाच्या कार्यात कर्तव्यदक्ष अधिकारी निर्माण व्हावेत, यासाठी युवावर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी उत्सुक आहे.
- सुनील पाटील, संचालक, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी, नाशिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT